मुंबई

ठाण्यात शिवभक्तीचा उसळला सागर

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : ‘हर हर महादेव...’, ‘बम बम भोले...’चा जयघोष करत ठाणे जिल्ह्यात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. ठाण्यातील कोपनेश्वर मंदिर, अंबरनाथ येथील शिवमंदिर, डोंबिवली येथील पिंपळेश्वर, खिडकाळेश्वर मंदिर, कल्याणच्या पारनाक्यावरील शिवमंदिरासह जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या मंदिरांमध्ये पहाटेपासूनच शिवपिंडीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्रीचा उत्साह ठाण्यात पाहायला मिळाला. पहाटेपासूनच सर्वच शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी दहा वाजल्यानंतर उन्हाचा पारा वाढला असतानाही भाविकांचा उत्साह तसाच होता. दुपारच्या सत्रात मंदिरांमध्ये गर्दी थोडी कमी होती; पण सायंकाळी चार-पाच वाजल्यानंतर मंदिरांमध्ये भाविकांनी पुन्हा दर्शनासाठी रांगा लावल्या असल्याचे दिसले. दुसरीकडे आकर्षक रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने मंदिरांना सजवण्यात आले होते. मंदिराबाहेर बेलपत्र, फुले आणि दुधाच्या पिशव्या असलेले अनेक छोटे-मोठे स्टॉल लागले होते; पण समाधानाची बाब म्हणजे अनेक मंदिरांमध्ये शिवपिंडीवर दुग्धाभिषेक न करता बेलपत्र व फुले वाहून भाविकांनी आपली श्रद्धा अर्पण केल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे मंदिर व्यवस्थापनांनीही स्वच्छतेची काळजी घेतल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी बरोबरी करू शकत नाही, विक्रम मोडणं दूरच''; सरन्यायाधीशांनी कुणाचं केलं कौतुक?

"राम आणि रावण समोर येणार नाहीत !" रामायण विषयी यशचा मोठा खुलासा; म्हणाला...

Latest Marathi News Live Update: जालन्यात समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात

Woman Love Relationship : सैराटपेक्षाही धक्कादायक! पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय, घरच्यांनी विष पाजलं; मृतदेह जाळला अन्, कर्नाटक -महाराष्ट्र कनेक्शन

Solapur Sugar Mills : साेलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारांना प्रशासनाचे अभय; चारशे कोटींहून अधिक थकीत, मोजक्याच कारखान्यांवर कारवाई!

SCROLL FOR NEXT