मुंबई

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे विमानतळाचा आढावा

CD

‘डीजीसीए’कडून नवी मुंबई विमानतळाची पाहणी
विमानतळ सुरू होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २६ : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) संचालक फैज अहमद किडवई यांनी मंगळवारी (ता. २५) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पस्थळाला भेट देत विविध कामांची पाहणी केली. या विमानतळावर ११ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय हवाई दलातर्फे घेण्यात आलेली इन्स्ट्रूमेन्ट लॅंडिंग चाचणी आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोतर्फे घेण्यात आलेली प्रवासी विमान लॅंडिंग चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ही विमानतळ सुरक्षा नियामक संस्था असून त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेल्या भेटीत या विमानतळाच्या सज्जतेचा आढावा घेत मूल्यमापन केले. यामध्ये धावपट्टी, एप्रन, टॅक्सी वे, एटीसी टॉवर टर्मिनल बिल्डिंग, बॅगेज हॅंडलिंग सिस्टीम इत्यादी व्यवस्था करण्यात आली. या पाहणीदरम्यान ‘मॉक चेक-इन’ प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. यामध्ये डमी बोर्डिंग पास आणि बॅगेज टॅग जारी करण्यात आले. या वेळी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष विपिन कुमार, नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळाचे प्रादेशिक संचालक प्रकाश निकम, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ) गीता पिल्लई आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, सोमवारी (ता. २४) नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या विमानतळाची पाहणी केली.

...
प्रादेशिक विकासाला चालना
सिडकोतर्फे १,१६० हेक्टरवर विकसित करण्यात आलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रती वर्ष २० दशलक्ष प्रवासी आणि ०.८ दशलक्ष टन माल वाहतुकीकरिता नियोजित आहे. अंतिम टप्प्यात विमानतळाची प्रती वर्ष प्रवासी वाहतूक क्षमता ९० दशलक्ष आणि माल वाहतूक क्षमता २.६ दशलक्ष टन असणार आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी भार हलका करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यात आले आहे. हे विमानतळ मुंबई महानगर प्रदेशातील मध्यवर्ती ठिकाणी असून या विमानतळाद्वारे एमएमआर प्रदेशाच्या विकासाला चालना मिळणार आहे. सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला उपनगरीय रेल्वे, मेट्रो, जलवाहतूक यांसह प्रस्तावित हैदराबाद हायस्पीड रेल्वेद्वारे कनेक्टिव्हिटी नियोजित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT