मुंबई

नवीन जलस्‍त्रोतांची शोधण्याची गरज

CD

पनवेल, ता. २७ (बातमीदार) ः सिडकोने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जवळपास २६ हजार घरांची निर्मिती केली आहे. त्यापैकी सोडतीमध्ये १९ हजारांहून अधिक जणांना घरे मिळाली आहेत. काही महिन्यांमध्ये संबंधितांना घराचा ताबा दिला जाणार आहे. या सदनिकांसाठी दिवसाला कमीत कमी २० एमएलडी पाणी लागणार आहे. आधीच अनेक सिडको वसाहतींमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्‍या पार्श्वभूमीवर नवीन घरांना सिडको कुठून पाणी देणार, यासाठी काय नियोजन केले आहे, असा प्रश्‍न नागरिकांकडून विचारला जात आहे. केवळ इमारती, घरे बांधून होणार नाही, तर नवीन जलस्‍त्रोत निर्माण करण्याची गरज असल्‍याचे बोलले जात आहे.
सिडको वसाहतींची तहान दिवसेंदिवस वाढत आहे. पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोने सर्व भूखंड निविदा काढून विक्री करण्याचा धडाका लावला आहे. खासगी बांधकाम व्यावसायिकांकडून अनेक प्लॉट विकत घेऊन त्या ठिकाणी इमारती बांधण्याचे काम सुरू आहे. काहींचे कामही पूर्ण झाले असून, लोक वास्तव्यास आले आहेत. सिडकोने पार्किंग आणि बस डेपोच्या राखीव जागेवरही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत काही वर्षांपूर्वी घरे बांधण्याचा निर्णय घेतला. खाली वाहनतळ आणि बस टर्मिनल्स आणि वर इमारती बांधण्यात येत आहेत.
खांदेश्वर, मानसरोवर रेल्वे स्थानक, खांदा कॉलनी, कळंबोली, तळोजा, खारकोपर, बामणडोंगरी, खारघर या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जवळपास २६ हजार घरे बांधण्यात आली आहेत. त्यापैकी १९ हजार भाग्यवान विजेत्यांना सोडतीमध्ये घरे मिळाली आहेत. हे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच सदनिकाधारकांना घरांचा ताबा दिला जाणार आहे. पनवेल महापालिका हद्दीतील सिडकोच्या गृहप्रकल्‍पांची संख्या मोठी आहे. महापालिकेकडे सिडको वसाहती हस्तांतरित करण्यात आले असल्या तरी अद्याप पाणीपुरवठा हा प्राधिकरणाकडून केला जात आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नवी मुंबई महापालिका त्याचबरोबर हेटवणे धरणातून पाणी घेऊन पनवेल महापालिका क्षेत्रात वितरित करण्याचे नियोजन आहे, मात्र पाण्याची एकूण मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्याने बाहेर धो धो पाऊस पडत असला तरी अनेक वसाहतींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.
पनवेल महापालिकेची स्थापना होऊनही जवळपास आता आठ वर्षे झाली तरी शाश्वत पाण्याचा स्त्रोत निर्माण करण्यामध्ये प्रशासनाला फारसे यश आलेले नाही. एकीकडे पाण्याची कमतरता असताना दुसरीकडे राज्य व केंद्र सरकारच्या आदेशानुसार सिडकोने हजारोंच्या संख्येने घरे बांधली आहेत. त्याचबरोबर खासगी बांधकाम व्यावसायिकांना विक्री करण्यात आलेल्या भूखंडांवरही टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. साहजिकच येत्‍या काही महिन्यांत पाण्याची मागणी आणखी वाढणार असून, नागरिकांची तहान भागवण्याचे मोठे आव्हान सिडकोसमोर आहे.

पुष्पकनगर, नैना परिसरात बांधकामे!
पंतप्रधान आवास योजनेव्यतिरिक्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित प्रकल्पग्रस्तांना पुष्पकनगर या ठिकाणी प्लॉट देण्यात आले आहेत. याशिवाय ठिकठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त नैना क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे साहजिकच पनवेलकरांची तहान भागवण्यासाठी वाढीव जलस्‍त्रोत आणि पुरवठ्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत सिडको नेमकी काय भूमिका घेते व कसे नियोजन करते, असे प्रश्‍न नागरिकांना पडले आहे.

वाढीव पाणी आणणार कुठून?
सिडकोकडून नव्याने २६ हजार घरे बांधण्यात आले आहेत. वाशी ट्रक टर्मिनल्स वगळता बाकी सर्व इमारती या दक्षिण नवी मुंबईत म्हणजेच सिडकोच्या अखत्यारीत आहे. या ठिकाणी पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी प्राधिकरणावर आहे. नागरी वसाहतीमध्ये एका व्यक्तीला सरासरी १३५ लिटर पाण्याची आवश्यकता असते. प्रत्येक घरांमध्ये किमान चार ते पाच व्यक्तींचे वास्तव्य असल्‍यास साडेसतरा एमएलडी पाण्याची गरज आहे. हा आकडा सरासरी असून, दिवसाला कमीत कमी २० एमएलडी पाण्याची गरज या घरांना आहे. हे वाढीव पाणी संबंधितांना देण्यासंदर्भात सिडको नेमके पाणी आणणार कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

BJP Office: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट; संपूर्ण परिसर केला सील, भाजप नेते म्हणाले...

Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरण विशेष सत्र न्यायालयाकडे वर्ग

LSG vs DC Live: कॅच सुटला, पण रिषभ पंतचा 'दुर्दैवी' कार्यक्रम झाला; लखनौचा कॅप्टन विचित्र पद्धतीने बाद झाला...

भाई, भलताच 'डेअरिंग'बाज निघाला... मॅच अर्ध्यावर सोडून लंडनसाठी पकडले विमान, १० खेळाडूंसह संघाला खेळावे लागले अन्...

SCROLL FOR NEXT