मुंबई

स्मार्ट प्रीपेड मीटर्सला उल्हासनगरमध्ये विरोध

CD

उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)तर्फे संपूर्ण राज्यात स्मार्ट प्रीपेड मीटर्स बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कोणत्याही ग्राहकांची परवानगी न घेता सक्तीने हे मीटर्स बसवले जाणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ग्राहकांनी या सक्तीच्या धोरणाला कडाडून विरोध दर्शविला आहे. महावितरणने हे मीटर्स ग्राहकांना मोफत देण्याची जाहिरात केली असली, तरी प्रत्यक्षात हा खर्च ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केला जाणार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे उल्हासनगरचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी केला आहे.
उल्हासनगर शहरातील ठाकरे गट आणि काही वीजग्राहकांनी उल्हासनगर विभागातील कार्यकारी अभियंत्यांकडे शेकडो पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. ३) या विषयावर निवेदन सादर केले. या वेळी उल्हासनगर विभागीय १चे कार्यकारी अभियंता सतीश कुलकर्णी आणि विभागीय २चे कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले उपस्थित होते. आम्हाला स्मार्ट प्रीपेड मीटर्स नकोत. आमचे पोस्टपेड मीटर तसेच ठेवण्यास इच्छुक आहोत, असे निवेदनात नमूद केले आहे. महावितरण कंपनीने मंजूर केलेल्या निविदांनुसार प्रत्येक स्मार्ट प्रीपेड मीटरचा खर्च सुमारे १२ हजार रुपयांचा इतका आहे. यासाठी केंद्र सरकारकडून फक्त ९०० रुपयांचे अनुदान दिले जात आहे. उर्वरित ११ हजार १०० रुपये ग्राहकांच्या खिशातून वसूल केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी दिली. हा खर्च वीज दरवाढीच्या स्वरूपात एप्रिलपासून लागू होणार आहे. परिणामी, प्रति युनिट वीजदर किमान ३० पैसे वाढण्याची शक्यता आहे. त्या‍मुळे सर्वसामान्य ग्राहकांवर मोठा आर्थिक भार पडेल, बोडारे म्हणाले. महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठा रोष आहे. या निर्णयाविरोधात ग्राहक आक्रमक होत असून, सक्तीने स्मार्ट मीटर बसवले गेले, तर प्रखर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

स्मार्ट प्रीपेड मीटर्स बसवण्याचा निर्णय ग्राहकांच्या हक्कांवर गदा आणणारा आहे. यामुळे वीजदर वाढणार असून सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडणार आहे. या सक्तीच्या निर्णयाचा तीव्र विरोध करतो. ग्राहकांना कोणता मीटर वापरायचा याचा संपूर्ण अधिकार आहे. जर जबरदस्तीने हे मीटर्स बसवले, तर तीव्र आंदोलन करू.
- धनंजय बोडारे, जिल्हाप्रमुख, ठाकरे गट

शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटरविरोधात निवेदन दिले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवले आहे. ते याबाबत योग्य तो निर्णय घेतील.
- प्रवीण चकोले, कार्यकारी अभियंता, महावितरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT