मुंबई

कुर्ला बॅँकेच्या शाखा निहाय निवडणूक घेण्यास अधिकाऱ्याचा नकार

CD

कुर्ला बॅँकेच्या शाखानिहाय निवडणुका घेण्यास अधिकाऱ्याचा नकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : दि. कुर्ला नागरिक सहकारी बँकेच्या १६ मार्च २०२५ रोजी नियोजित निवडणुकीतील गंभीर अनियमितता असून, या निवडणुका स्थगित करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली होती; मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शासकीय नियमाला बगल देत शाखानिहाय निवडणूक घेण्यास नकार दिल्याची माहिती गलगली यांनी दिली.

अनिल गलगली यांनी राज्य सहकारी निवडणूक आयुक्त यांस पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, ‘महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ च्या नियम ३ (ह) नुसार, मतदान केंद्रे अधिक संख्येने व सोयीच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे, मात्र निवडणूक निर्णय अधिकारी नितीन दहीभाते यांनी केवळ एका ठिकाणी मतदान ठेवण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. शाखानिहाय मतदान केंद्रे ठेवल्यास अधिकाधिक सभासदांना मतदानाची संधी मिळेल आणि पारदर्शक निवडणूक पार पडेल. बँकेने मागील २० वर्षांत मतदारयादी अद्ययावत केलेली नाही. त्यामुळे हजारो मृत मतदारांची नावे अद्याप मतदारयादीत आहेत, ज्यामुळे बोगस मतदानाचा मोठा धोका आहे.’

..
निवडणुका स्थगित करण्याची मागणी
योग्य मतदारयादी तयार न करता निवडणूक घेणे म्हणजे लोकशाहीची थट्टा करण्यासारखे आहे, असे मत गलगली यांनी व्यक्त केले. तसेच रविवारी १६ मार्च रोजी रेल्वे मेगाब्लॉक असल्याने ठाणे, वाशी, मुलुंड आणि भांडुप येथील मतदारांना मतदानासाठी येणे कठीण होईल. त्यामुळे या निवडणुका स्थगित करण्याची मागणी गलगली यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT