मुंबई

विकसित भारत महिला उद्योजिका संमेलनात उद्योजिकांचा सन्मान

CD

विकसित भारत महिला उद्योजिका संमेलनात उद्योजिकांचा सन्मान


मुंबई, ता. ४ : आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक सक्षमीकरणाकडे महिलांचा प्रवास सुरू असून, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा निधी व बचत गटाच्या माध्यमातून लाडक्या बहिणी, लाडक्या उद्योजिका बनवण्याचे काम ‘झेप’ उद्योगीनीच्या संस्थापिका पूर्णिमा शिरीषकर करत असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे शुक्रवारी (ता. २८) आयोजित ‘विकसित भारत महिला उद्योजिका २०२५’ संमेलनात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी, महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योग करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक फरोग मुकादम, डॉ. मंजू मंगलप्रभात लोढा (अध्यक्ष – लोढा फाउंडेशन), नगरसेविका हर्षिता नार्वेकर, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कार्यकारी संचालक रूपा नाईक, ‘झेप’च्या संचालिका पौर्णिमा शिरीषकर यांच्यासह ५०० हून अधिक स्वयंम उद्योजिका, बचत गटाच्या महिला आणि समाजकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता बॅलन्स केमिस्ट्री व्हिडिओ वर्क, मार्केइट, ग्रीन एम फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले. झेप उद्योगिनींची व महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ आयोजित या संमेलनात आयएएस महिला अधिकाऱ्यांच्या मुलाखती, निवड झालेल्या २२ महिलांचा ब्रँड वॉक शो, एमएसएमई उत्पादनांचे प्रदर्शन, चर्चासत्र, शासकीय योजनांचे माहितीसत्र, उद्योजिका पुरस्कार समारंभ तसेच लाडकी बहीण ते लाडकी उद्योजिका या प्रवासाची माहिती या सत्रांचा समावेश करण्यात आला.

विकसित भारत महिला उद्योजिका संमेलनाला उपस्थित मान्यवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi : "चाणक्य आज जिवंत असते तर त्यांना धक्काच बसला असता..." प्रियंका गांधींची अमित शाह यांच्यावर टीका, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजपवर गंभीर आरोप

MI vs PBKS Live: खतरनाक थ्रो! श्रेयस अय्यरने 'चेंडू' वेगाने फेकला, पंजाबच्या खेळाडूच्या डोक्यावर आदळला... सोडावं लागलं मैदान

Congress Row : काँग्रेसचे टेन्शन वाढलं ! राज्यातील बडा नेता नाराज, थेट पक्ष सोडण्याचा दिला इशारा

मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आधारित 'मिशन मुंबई' चित्रपट मोठ्या पडद्यावर, अजय शर्मा मुख्य भूमिकेत

SCROLL FOR NEXT