मुंबई

अखेर क्षेपणभूमी आरक्षण रद्द

CD

...अखेर क्षेपणभूमी आरक्षण रद्द
वसई, ता. ४ (बातमीदार) : वसई-विरार उपप्रदेशाच्या मंजूर विकास आराखड्यातील आचोळे येथील क्षेपणभूमी एसटीपी आरक्षणात फेरबदल करून गास, दिवाणमान, चुळणे गिरीज व आचोळे येथील मिठागरासाठीच्या शासकीय जागेत प्रस्तावित केला होता; मात्र याला लोकप्रतिनिधी व नागरिकांचा विरोध झाल्याने हा प्रस्ताव रद्द केल्याची माहिती आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली.

नालासोपारा (प.) येथे २००७च्या विकास आराखड्यात आरक्षण क्र. ४०२ हे मलनिस्सारण केंद्रासाठी आरक्षित आहे. भविष्यात २०४१पर्यंत शहराची लोकसंख्या ५० लाखांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शासकीय जागेतील १०,००० चौ.मी. ही या मलनिस्सारण केंद्राच्या आरक्षणाशेजारील जागेचा फेरबदलदेखील केला होता. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता घनकचरा साठवणूक, विल्हेवाट लावण्यासाठी नवीन क्षेत्र निश्चित केले होते; मात्र निर्णय रद्द करण्यात आला आहे.

प्रशासनाला नागरिकांकडून एकूण २,५०० इतक्या मोठ्या संख्येने हरकती/सूचना प्राप्त झाल्या आहेत. नव्याने मलनिस्सारण केंद्रासाठी वाढीव क्षेत्र निश्चित केले होते. ते वगळण्याबाबतची मागणी होती. याच मुद्द्याला अनुसरून आमदार राजन नाईक व आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनीदेखील ही प्रारूप अधिसूचना रद्द करण्याची मागणी महानगरपालिकेकडे नोंदवली होती. महानगरपालिकेने २००७च्या मंजूर विकास आराखड्यातील आचोळे येथील सर्व्हे नं. २२ ते ३२ व ८३ या भूखंडावरील आरक्षण क्षेपणभूमी व मलनिस्सारण केंद्र या प्रयोजनासाठी कायम ठेवल्याची माहिती नगररचना विभागाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT