मुंबई

बॉटनिकल उद्यानाला अवकळा

CD

नरेश जाधव ः सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. ९ ः कानविंदे येथील स्व. उत्तमराव पाटील बॉटनिकल उद्यानाची सध्या दुरवस्था झाली आहे. या उद्यानाचे मुख्य आकर्षण असलेल्या पंचांगाकृती नक्षत्रवनातील राशीप्रमाणे लावलेली झाडे पाण्याअभावी सुकून गेली आहेत. तसेच साचलेल्या पालापाचोळ्यामुळे उद्यानाला अवकळा आली आहे. त्यामुळे उद्यानात मूलभूत सुविधा देण्याची मागणी पर्यटकांमधून होत आहे.
कानविंदे येथील उत्तमराव पाटील बॉटनिकल उद्यानात १२ राशींच्या पंचांगाकृती नक्षत्रवनाची उभारणी करण्यात आली आहे. पंचांगातील राशी, नक्षत्र व चरणांचा यात समावेश करून त्याप्रमाणे लावलेली झाडे उद्यानाचे मुख्य आकर्षण आहे. तसेच स्थानिक प्रजातींच्या झाडांचीही उद्यानात लागवड करून त्यांचे राशीप्रमाणे नामकरण करण्यात आले आहे. शहापूर वनपरिक्षेत्र हद्दीतील मुंबई-नाशिक महामार्गालगतचे हे उद्यान मुंबई-नाशिक महामार्गावरून ये-जा करणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकते. तसेच या माध्यमातून पर्यटकांना निसर्गाचे दर्शन घडणार असून, शहापूर परिसरातील एक पर्यटनस्थळ म्हणून हे ठिकाणा नावारूपाला येऊ शकते. पण उद्यानाची दुरवस्था झाल्याने पर्यटक पाठ फिरवत आहेत.
दरम्यान, शहापूरच्या कानविंदे बॉटनिकल गार्डनची दरवर्षी डागडुजी करण्यात येते. सद्यःस्थितीत दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविण्यात आला असून, त्याला मंजुरी मिळाल्यानंतर उद्यानाचे नूतनीकरण केले जाणार असल्याचे खर्डीचे वनक्षेत्रपाल लक्ष्मण चिखले यांनी सांगितले.
-------------------------------------------------------
पर्यावरण अभ्यासाला चालना
उद्यानात फळवन, चंपकवन, कदंबवन, अशोकवन, आम्रवन, जंबुवन, वंशवन, मदनवृक्ष वन, चरकवन, लतावन, सारिका वन, मृगसंचार वन, अतिथीवन यासारखी विविध प्रकारची उपवने निर्माण केली आहेत. तसेच औषधी वनस्पती उद्यान, फुलपाखरू उद्यान, दिशा-उपदिशा उद्यान, स्मृतिवने, सुगंधी द्रव्य उद्यान, बांबू सेटम, काटेरी वृक्ष समूहातून पर्यावरण अभ्यासाला चालना मिळते.
-----------------------------------------
‘या’ समस्यांकडे दुर्लक्ष
उत्तमराव पाटील बॉटनिकल उद्यानात साचलेल्या पालापाचोळ्यामुळे आयुर्वेदिक झाडांची माहिती पर्यटकांना उपलब्ध होत नाही. येथे बनवलेला तलाव पूर्णपणे सुकून गेला आहे. तसेच विहिरीत गाळ साचला असून, जलवाहिनीला गळती लागल्याने पाणी पोहोचत नसल्याने झाडे सुकून गेली आहेत. तसेच उद्यानातील राशींच्या झाडाबद्दल जनजागृतीसाठी नवीन माहिती फलक लावण्याची गरज आहे.
-------------------------------------------------------------
नाशिक येथील फुलपाखरू उद्यानाप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिल्यास कानविंदे येथील उत्तमराव पाटील बॉटनिकल उद्यान पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकते. तसेच वन विभाग या माध्यमातून स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो.
- विठ्ठल भोईर, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT