उल्हासनगर, ता. ९ (वार्ताहर) : शहरात मटका, जुगार, दारू अड्डे अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्यात गुन्हेगारी घटनांतही वाढ झाली आहे. याबाबत आमदार कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली होती. त्याची मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेत उल्हासनगर पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. या आदेशान्वये पोलिस ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी जुगार-मटक्याच्या धंद्यावर धाडसत्र टाकण्यास आणि जुगारांना अटक करण्यास सुरुवात केली.
शहरात मटका, तीन पानी जुगार, ऑनलाइन लॉटरी, गावठी दारू अड्डे, गांजा विक्री आदी अवैध धंदे सुरू आहेत. त्यातून हत्या, हाणामाऱ्यांच्या घटना घडलेल्या आहेत. पोलिसांवर कारवाई करतात; पण पुन्हा बाहेर आल्यावर जैसे थे परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र सातत्याने दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात आमदार आयलानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले. फडणवीस यांनी या निवेदनाची दखल घेऊन कारवाईचे आदेश दिल्यावर पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षकांनी त्यांच्या हद्दीत चोरी छुपे सुरू असलेल्या अवैध धंद्यावर धाडसत्र टाकण्यास सुरुवात केली. यात मठमंदिर, संगम लॉज, ३८ सेक्शन, सोनार गल्ली, कराची मटण शॉपची गल्ली आदी ठिकाणी मटका जुगारांच्या अड्ड्यांवर छापा टाकण्यात आला. यात अनेक जुगाऱ्यांना अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. ही कारवाई सतत सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.