वाशी, ता. ९ (वार्ताहर) : नवी मुंबई महापालिकेने माझी वसुंधरा मोहिमेअंतर्गत एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे पर्यावरणवाद्यांनी स्वागत केले आहे; मात्र त्याचवेळी त्यांनी पावणे येथील २०० झाडे वाचवण्याची विनंतीही महापालिकेकडे केली आहे.
पावणे रासायनिक क्षेत्रातील ३,६०० चौरस मीटर खुल्या जागेवर (ओएस-७) मोठी वाढलेली २०० झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. विकास आराखड्यात (डीपी) एमआयडीसीने प्रकल्पग्रस्त व्यक्तीला (पीएपी) व्यावसायिक वापरासाठी ३०० चौरस मीटरचा भूखंड दिला आहे. त्यामुळे ही झाडे धोक्यात आली आहेत. खुल्या जागेत एमआयडीसीचे नियम व्यावसायिक कामांना परवानगी देत नाहीत. तरीही प्रकल्पग्रस्तांना रासायनिक क्षेत्रातील जागा व्यावसायिक बांधकामासाठी देण्यात आल्याने पर्यावरणवाद्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याला विरोध नाही; पण त्यामुळे झाडे नष्ट होऊ नयेत, अशी पर्यावरणवाद्यांची मागणी आहे. प्रकल्पग्रस्तांना इतरत्र स्थलांतरित करावे, अशी मागणी पर्यावरणवाद्यांकडून करण्यात येत आहे.
-----------------------
पुढील सुनावणी २६ एप्रिलला
पर्यावरणवादी संस्था नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी या प्रकरणाबाबत पुढाकार घेतला असून, राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) धाव घेतली आहे. शहरात हरित क्षेत्रे कमी असल्याने त्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. त्यामुळेच एनजीटीकडे अर्ज केला असल्याचे कुमार यांनी सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ एप्रिलला होणार आहे. दरम्यान, काही लोकांनी तिथे लोखंडी सळ्यांनी खोदकाम सुरू केले आहे. याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांशी बोलून येथील हरित जागा वाचवण्याचे आवाहन केले असल्याची माहिती कुमार यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.