दिव्यात डम्पिंग ग्राउंडसाठी मनसे आक्रमक
कळवा, ता. १० (बातमीदार) : दिवा गावात पुन्हा एकदा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याने येथील रहिवासी आक्रमक झाले आहेत. माजी आमदार राजू पाटील यांनी दिव्यात डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच मुंब्र्यातील नागरिकांनी ही विरोध केल्यावर ठाणे महापालिकेने हा डम्पिंग ग्राउंड शिळ येथे स्थलांतरित केले; मात्र अधूनमधून गुपचूपरित्या ठाणे महापालिका घनकचरा विभागाच्या घंटागाडीने कचरा टाकत आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंब्रा खाडीवरील चूआ पुलावरून साबा गावच्या हद्दीत कचरा टाकण्यात आला. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने मनसे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील व किसन पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कचरा घेऊन येणाऱ्या गाड्या अडवून धरल्या. त्यामुळे पुन्हा एकदा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे कचरा डम्पिंग होऊ नये, यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी गावाबाहेरील कच्चा रस्ता खोदून ठेवला आहे; मात्र छुप्या मार्गाने खाडी पुलावरून काही गाड्या कचरा टाकत असल्याने डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी प्रकाश पाटील यांनी केली आहे. याप्रकरणी दिवा प्रभाग समितीचे उपमुख्य स्वच्छता निरीक्षक डोंगर परदेशी यांना विचारणा केल्यावर त्यांनी म्हटले की, गाडी अडवल्याची माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही; मात्र अशा गाड्या जात असतील, तर त्याची माहिती घेऊन चौकशी केली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.