मुंबई

शिवगंगानगर पाणीटंचाईचे संकट

CD

अंबरनाथ, ता. १० (बातमीदार) : अंबरनाथच्या शिवगंगानगरमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने परिसरातील संतप्त महिलांनी थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याच्या कार्यालयाला धडक दिली. या वेळी महिलांनी याबाबत जाब विचारत कार्यकारी अभियंत्यांसमोर तक्रारींचा पाढाच वाचला.
अंबरनाथच्या पूर्व भागातील शिवगंगानगर परिसरात नागरिकांना १५ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपच्या महिला आघाडी अध्यक्षा सुजाता भोईर यांनी सोमवारी (ता. १०) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी समस्येवर अधिकाऱ्यांना जाब विचारला. शिवगंगानगर परिसरातील नागरिकांना १५ दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने महिलांनी सुजाता भोईर यांच्या नेतृत्वाखाली मजीप्रा कार्यालयात धडक दिली आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले. परिसरात टाकण्यात आलेल्या नवीन जलवाहिनीला पाणी येत असल्याने नागरिकांनी त्यावर नळजोडणी घेतली. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी त्या जलवाहिनीवरून सुरू असलेला पाणीपुरवठा बंद केल्याचा आरोप सुजाता भोईर यांनी केला. येत्या पाणीपुरवठा पुरवत न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.
येत्या दोन दिवसांत शिवगंगानगर परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भोईर यांनी मजीप्राचे कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांना दिला.

तांत्रिक कारणामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शुक्रवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याकडे लक्ष देण्यात येईल.
- मिलिंद देशपांडे, कार्यकारी अभियंता, मजीप्रा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: इस्लामाबादमधील तिढ्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT