मुंबई

३१ मार्चपर्यंत घ्या अभय योजनेचा लाभ

CD

वाशी, ता. १० (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेने थकीत मालमत्ता करधारकांसाठी अभय योजना लागू केली असून, सोमवारपासून (ता. १०) ५० टक्के विलंब शास्ती देण्यात आली आहे. यामुळे थकीत मालमत्ता करधारकांना दिलासा मिळणार आहे. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबत निर्णय घेतला असून, मालमत्ता कर थकबाकीदारांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि विलंब शुल्क वजा करून आपली देयके भरावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अभय योजनेंतर्गत मूळ मालमत्ताकराच्या थकीत रकमेत कोणतीही सवलत नसून मूळ मालमत्ता कर तसेच सवलतीनंतरच्या शास्तीसह येणारी संपूर्ण देय रक्कम भरणा करणे आवश्यक आहे. अंशतः भरलेल्या रकमेस या योजनेचा लाभ मिळणार नाही. नवी मुंबई महापालिकेने मालमत्ता करातून महसूल गोळा करण्यासाठी कंबर कसली आहे. ९०० कोटींचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अद्याप ६३० कोटी महसूल पालिकेने गोळा केला आहे; तर अभय योजना कधी सुरू होईल याकडे थकीत मालमत्ता करधारकांचे डोळे लागले होते. अखेर पालिकेने ५० टक्के शास्तीमध्ये सूट देत अभय योजना सुरू केली आहे. ३१ मार्चपर्यंत चालू वर्षापर्यंतचा मालमत्ता कर एकरकमी भरल्यास मालमत्ता कर विलंब शास्तीमध्ये ५० टक्के सूट देण्यात येणार आहे.
------------
असा घ्या योजनेचा लाभ...
अभय योजनेसाठी nmmc.gov.in या संकेतस्थळावर ‘My NMMC - माझी नवी मुंबई’ या मोबाईल ॲपवर त्याचप्रमाणे महापालिका मुख्यालय, सर्व विभाग कार्यालये व सर्व देयक भरणा केंद्रांवर अर्ज करायचा आहे. मालमत्ता कराचा भरणा रोख, धनादेश अथवा धनाकर्ष याद्वारे भरता येईल. धनादेश हे अभय योजनेच्या कालावधीमध्ये कोणत्याही कारणास्तव न वठल्यास अर्जदारास अभय योजनेचा लाभ अनुज्ञेय होणार नाही. कराचा भरणा संकेतस्थळ व मोबाईल ॲपवरसुद्धा भरता येणार आहे. रोखीने भरणा करावयाचा असल्यास भारतीय रिझर्व्ह बँकेचे यासंदर्भातील नियम लागू होणार आहेत.
----------------
अभय योजना लागू होण्यापूर्वी भरणा केलेला मालमत्ता कर तसेच शास्तीसंदर्भात कोणतीही सूट मिळणार नाही. त्याचा परतावादेखील मिळणार नाही. अभय योजना ही केवळ १० मार्च ते ३१ मार्च रात्री १२ वाजेपर्यंत विहीत मुदतीत चालू वर्षापर्यंतचा मालमत्ता कर एकरकमी भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांनाच लागू असणार आहे. यामुळे नागरिकांनी मुदतीत चालू वर्षापर्यंतचा मालमत्ता कर एकरकमी भरणा करून अभय योजनेचा लाभ घ्यावा.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

खट्याळ, बिनधास्त आणि गप्पिष्ट बाईची मजेशीर दुनिया; कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत यांच्या ‘भागूबाई’चा ट्रेलर प्रदर्शित

Latest Marathi News Live Update: मुंबईत गांजा विकणाऱ्या दोन आरोपींना अटक

सतीश राजवाडे आणि ये रिश्ता फेम अभिनेत्रीचा रंगभूमीवर कमबॅक; नाटकाचं नाव आणि शुभारंभाची तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT