मुंबई

करवाढीवरून आक्रोश

CD

वसई, ता. १० (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पाणीपट्टी, मालमत्ता करात वाढ केली आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील महापालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे करवाढीच्या तरतुदीचे पडसाद वसई-विरारमध्ये उमटू लागले आहेत. पालिकेने परस्पर हा निर्णय घेत नागरिकांवर कराचा बोजा वाढवल्याने शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि भाजप आक्रमक झाला आहे. पाणीपट्टीत केलेली वाढ रद्द करा अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

वसई-विरार महापालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी पाणीपट्टी दरात पाच टक्के, तर निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता करात पाच ते सात टक्के दरवाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांवर कराचा बोजा वाढणार आहे. सध्या पालिकेत प्रशासकीय राजवट आहे. अर्थसंकल्पामध्ये विकासासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदींचा समावेश आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढण्यासाठी पाणी आणि मालमत्ता करात वाढ केली असल्याचे जाहीर करण्यात आले. शहरातील काही भागांत सुरळीत पाणीपुरवठा नसल्याने प्रशासकीय कारभाराविरोधात नाराजी आहे. आवश्यक पाणी मिळत नसल्याने पहिल्यापासून नागरिकांमध्ये नाराजी आहे. अशातच महापालिका प्रशासनाने करवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात पक्षांनीदेखील नागरिकांची बाजू घेत आक्रोश केला आहे.

पालघर जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रलकर यांनी वसई-विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांची भेट घेत निवेदन दिले. या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर नाना पाटील, राजाराम बाबर, हरिश्चंद्र पाटील, प्रथमेश राऊत, काकासाहेब मोटे, सचिन म्हात्रे यांच्यासह महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पाणीपट्टी रद्द करण्याची जोरदार मागणी केली.

दुसरीकडे अर्थसंकल्पात मालमत्ता कर आणि पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात आल्याने या वाढीबाबत संताप व्यक्त करत भाजपने आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे वाढीव कर रद्द करण्याची मागणी केली आहे.

करवाढीसाठी प्रयत्न
मालमत्ता करवाढीच्या अनुषंगाने महापालिका विविध कार्यवाही करत आहे. यात दरसुधारणा, निवासी, वाणिज्य व औद्योगिक असे मालमत्तांचे प्रकार, प्रस्तावित मालमत्तांचे प्रकार, मोकळ्या भूखंडांवरील कर आकारणी अशा उपाययोजना आखण्यात येत आहेत. यातून पालिकेने मालमत्ता उत्पन्नात ५०-७५ कोटींची वाढ अपेक्षित धरली आहे. महापालिकेने मालमत्ता कराकरता ५.३४ कोटींचे लक्ष्य ठेवले आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. दोन आठवड्यांत मालमत्ता आणि पाणी दरवाढ अग्रक्रमाने रद्द करण्यात यावी, अन्यथा महापालिकाविरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत.
- प्रवीण म्हाप्रळकर, पालघर जिल्हाप्रमुख, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)

अर्थसंकल्पात प्रशासनाने लादलेला कर पाहता नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने घेतलेला निर्णय रद्द करून करदात्यांना दिलासा द्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
- महेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, भाजप

आर्थिक वर्ष मालमत्ता करवसुली (कोटींमध्ये)
२०२२-२३ ३७२.८३
२०२३-२४ ३४५.६२
२०२४-२५ ३३०.९८ (७ मार्चपर्यंत )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT