मुंबई

बदलापुराचे तापमान ४२ अशांवर

CD

महामुंबईवर सूर्याचा प्रकोप
तलासरी ४३.६, तर मुरबाड ४३.२ अंशांवर
कल्याण/बदलापूर, ता. १० (बातमीदार) : ऐन मार्च महिन्यात महामुंबईत उष्णतेची अक्षरशः लाट आली असून, सोमवारी (ता. १०) पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे तब्बल ४३.६, मुरबाडमध्ये ४३.२, बदलापूरमध्ये ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. मुंबईत मुलुंड येथे ४०.१, बोरिवलीत ३८.५, तर सांताक्रूझ ३७.२ अंश सेल्सिअस इतके तापमान होते.
मार्च महिन्याची सुरुवात होताच राज्यात उकाड्याला सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवसांत तापमानात वाढ होत होती. त्यात सोमवारी महामुंबईत सर्वत्र उन्हाचे चटके लागत होते. पुढील तीन-चार दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. उत्तर आणि ईशान्येकडून येणाऱ्या उष्ण, कोरड्या हवेमुळे ही उष्णतेची लाट आली आहे. थंड वारे वाहत नसल्याने ही उष्णतेची लाट आल्याचे हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दुपारच्या वेळेत शक्यतो बाहेर पडण्याचे टाळा, शरीराची पाण्याची पातळी वाढवा, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देत आहेत.
...
ठाण्यातही पारा चाळीशीपार
ठाण्यात मार्च महिन्यातील मागील १० दिवसांतील सर्वाधिक ४०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद सोमवारी (ता. १०) झाली. त्यामुळे उन्हाची दाहकता अधिक जाणवू लागली. नागरिकांचे पाय आपसूक लिंबू सरबत, ताक आदी शीतपेयांच्या गाड्यांकडे वळू लागले होते. हवामान खात्याने दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता.
...
प्रमुख शहरातील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई ३७.२
नवी मुंबई ४०
विरार ४१
कर्जत ४१.४
पनवेल ४१.५
पालघर ४२
खारघर ४२
डोंबिवली ४२.३
कल्याण ४२.४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT