मुंबई

दांडेकर महाविद्यालयात होणार बियाणे महोत्सवाचे आयोजन

CD

पालघर, ता. १० (बातमीदार) : देशी वाणांची बियाणी टिकावीत, त्यांची देवाण-घेवाण व्हावी, बियाणांचे संवर्धन व्हावे आणि त्यांचा प्रचार-प्रसार व्हावा या हेतूने पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाने २९ मार्च रोजी बियाणे महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्‍घाटन संस्थेचे अध्यक्ष सचिन कोरे यांच्या हस्ते होणार आहे.

पालघर जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार आणि देशी बियाणे संवर्धक आपल्याजवळ असलेली वेगवेगळी देशी बियाणी प्रदर्शनात मांडतील. त्यांची खरेदी-विक्री होईल. त्यासाठी महाविद्यालयातर्फे मोफत स्टॉल उपलब्ध करून दिला जाईल. फुलझाडे, पालेभाज्या, फळभाज्या, फळबिया, रानभाज्या, तृणधान्ये, कंद, औषधी वनस्पती आणि इतर अन्नधान्याचे देशी वाण यांची बियाणी प्रदर्शनात मांडण्यासाठी शेतकरी घेऊन येतील. बियाणे महोत्सवात सहभागी होऊ इच्छीणाऱ्या शेतकऱ्यांनी २५ मार्चपर्यंत नोंदणी करावी. वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अस्मिता राऊत (९८६७३९७७५३), डॉ. प्रकाश घरत (८३२९३२५५८२), डॉ. स्वप्नील केणी (९०२८६७८३३८) यांच्याशी संपर्क साधावा, असे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. चिंचणीचे ऑर्चिड फुलांचे उत्पादक रामचंद्र सावे आणि वाणगावचे ढोबळी मिरची उत्पादक राजेंद्र चुरी यांची सुहास राऊत हे मुलाखत घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT