मुंबई

कल्याणमध्ये पक्षी उष्माघाताचे बळी

CD

पक्षी उष्माघाताचे बळी
घार, बगळा, पोपटासह दुर्मिळ आयबिस अत्यवस्थ

संकेत सबनीस : सकाळ वृत्तसेवा
कल्याण, ता. १२ : मार्च महिना सुरू होताच आलेल्या उष्णतेच्या लाटेचा फटका आता माणसांबरोबरच पक्ष्यांनाही बसत आहे. कल्याण उपनगरासह तालुक्यात उष्माघातामुळे घार, बगळा, पोपटासह अत्यंत दुर्मिळ असा आयबिस पक्षीही पशुपक्ष्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेला अत्यवस्थ सापडले आहेत.

उत्तर आणि ईशान्य दिशेकडून येणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांमुळे सध्या ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. कल्याणमध्ये मंगळवारी (ता. ११) ४१.२ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. या तीव्र उन्हाचा फटका जसा माणसांना बसत आहे तसाच तो पक्षी आणि प्राण्यांनाही बसत आहे. म्हणून उष्माघातामुळे अत्यवस्थ होऊन जमिनीवर निपचीत पडणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढू लागली आहे. पशुपक्ष्यांच्या संरक्षण आणि हितासाठी काम करणाऱ्या पॉझ आणि रॉ या दोन संस्थांना कल्याण परिसरातून पक्ष्यांच्या बचावासाठीचे फोन येऊ लागले आहेत.

पॉझ या संस्थेला पलावा परिसरात एक घार नुकतीच अत्यवस्थ सापडली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ त्या घारीवर उपचार केले. कल्याण भागातील दत्ता बोंबे यांना कल्याण-उल्हासनगर पुलाजवळ बगळा, भोईवाडा इथे घार, कल्याणच्या डी-मार्टजवळ पोपट बेशुद्धावस्थेत आढळले. तसेच आयबिस हा अत्यंत दुर्मिळ पक्षीदेखील त्यांना पाण्याअभावी अस्वस्थ झालेला सापडला. बोंबे यांनी बचाव केलेल्या या पक्ष्यांवर रॉ या मुंबईतील संस्थेने उपचार करून त्यांचे संगोपन सुरू केले आहे.

उन्हाळ्यात पक्ष्यांना आपल्यासारखीच तहान लागते, पण त्यांना पाणी उपलब्ध होत नाही. वेळीच पाणी न मिळाल्याने त्यांच्या शरीरातील पाण्याचा अंश कमी होतो व ते थेट खाली पडतात. अशा अवस्थेत अधिक काळ राहिल्यास त्यांचा मृत्यूदेखील होऊ शकतो. अशावेळी आपण त्यांना पिण्यासाठी उपलब्ध करून द्यायला हवे.
- पवन शर्मा, रॉ संस्था

ठाणे जिल्ह्यातील पहिला ‘बीट द हीट’ नावाने प्रोजेक्ट आम्ही कल्याण-डोंबिवली इथे सुरू केला आहे. यात पशुपक्ष्यांना पाण्याची व्यवस्था केली गेली आहे. यात पाच लिटरचे पाण्याचे भांडे बसवले जाते, ज्याची काळजी ही स्थानिक पशुप्रेमींनी घ्यायची असते. हे पाणी दररोज बदललेदेखील जाते., जेणेकरून त्यात डासांच्या अळ्या होणार नाहीत.
- नीलेश भणगे, पॉज संस्था

बचावासाठी संपर्क करा
दरम्यान, तुमच्या परिसरात बेशुद्धावस्थेत प्राणी, पक्षी किंवा वन्यजीव, सरपटणारे प्राणी आढळल्यास पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा. अशा पशुपक्ष्यांच्या बचावासाठी या संस्थांकडून तत्काळ ॲब्युलन्सची व्यवस्था केली जाणार आहे.
रॉ संस्था – पवन शर्मा – ९८६९७८०२०२
पॉज संस्था – नीलेश भणगे – ७९००००३१२७
वन खात्याचा हेल्पलाइन क्रमांक - १९२६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT