मुंबई

उल्हासनगर शहराला लवकरच स्वतंत्र जलस्रोत मिळणार?

CD

उल्हासनगरला मिळणार स्वतंत्र जलस्रोत
जलसंपदामंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : उल्हासनगर शहराला लवकरच स्वतंत्र जलस्रोत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून उल्हासनगरसाठी स्वतंत्र पाणी आरक्षण आणि स्वयंपूर्ण जलस्रोताच्या मागणीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आता दिशा मिळत आहे. याचसंदर्भात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत उल्हासनगरसाठी पाणी आरक्षण आणि स्वतंत्र जलस्रोत उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

मुंबईतील विधानभवनात झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, प्रधान सचिव दीपक कपूर, आमदार कुमार आयलानी, सुलभा गायकवाड, किसन कथोरे, उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा आणि महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अशोक घुले उपस्थित होते. या बैठकीत आमदार कुमार आयलानी यांनी उल्हासनगरच्या वाढत्या पाणीसमस्या आणि भविष्यातील गरजांविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले, की उल्हासनगर शहराला आजतागायत स्वतंत्र पाणी आरक्षण नाही. शहराला मिळणारे पाणी एमआयडीसीच्या कोट्यातून मिळते. त्यासाठी महापालिकेला जास्त दराने पैसे मोजावे लागतात. त्याशिवाय या पाण्याच्या पुरवठ्यासाठी लागणाऱ्या वीज खर्च आणि बूस्टर पंपांमुळे मनपावर अतिरिक्त आर्थिक भार येतो.

३८ एमएलडी अतिरिक्त पाण्याची गरज
उल्हासनगरच्या लोकसंख्येचा विचार करता भविष्यात ३८ एमएलडी अतिरिक्त पाणी आरक्षणाची गरज भासणार आहे. त्यामुळे शहरासाठी स्वतंत्र जलस्रोत उभारणे अपरिहार्य असल्याचे आयलानी यांनी बैठकीत ठामपणे मांडले. या चर्चेची गंभीर दखल घेत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या विषयाचा सखोल अभ्यास करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे उल्हासनगरकरांना कायमस्वरूपी पाणीटंचाईच्या समस्येतून दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT