पनवेल, ता. १२ (बातमीदार) : कळंबोली वसाहतीमधील रस्त्याच्या कडेला असलेल्या पदपथावर नुकतेच पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले होते; परंतु निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जागोजागी ते निघाल्याचे चित्र वसाहतीमध्ये निर्माण झाले आहे.
पनवेल महापालिकेने विविध विकासकामांमध्ये प्रामुख्याने महापालिका क्षेत्रातील सिडको नोडमधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण व पदपथ दुरूस्त करण्याचे काम हाती घेतले आहे. त्या अनुषंगाने हस्तांतरानंतर पहिल्यांदाच यामध्ये वसाहतीमधील २७ किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये १२ किलोमीटर काँक्रीटचे रस्ते असून १६ किलोमीटर डांबरी रस्त्यांचा समावेश आहे. त्याच बरोबर कळंबोली नोडमधील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण व पुनर्पृष्ठीकरण करण्याचे काम गेल्या एक वर्षापासून कासवगतीने सुरू आहे. याच कामातील पदपथावर पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम मागील दोन महिन्यांपूर्वी करण्यात आले आहे; परंतु अवघ्या दोन महिन्यांत कळंबोली सेक्टर सहामधील शिर्के गार्डन परिसरातील रहदारीच्या रस्त्यावरील पदपथाची मोठी दुरवस्था झाली आहे. पदपथावर बसवलेले नवीन पेव्हर ब्लॉक निखळले असून ते रस्त्यावर व पदपथावर अस्ताव्यस्त पडलेले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पदपथावरून नागरिकांना चालणे कठीण होत आहे. बहुतांश नागरिकांना पदपथाऐवजी मुख्य रस्त्याने जाणे भाग पडत आहेत. तेथे पुन्हा पेव्हर ब्लॉक बसवून पदपथ दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.