अलिबागचा सफेद गुणकारी कांदा उरणमध्ये दाखल
उरण, ता. १२ (वार्ताहर) ः अलिबाग मध्ये सर्वाधिक पिकत असलेला आयुर्वेदिक गुणकारी सफेद कांदा उरण बाजारात दाखल झाला आहे. शरीराला गुणकारी असल्याने या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे हा कांदा खरेदी करण्यासाठी उरणकर सरसावले आहेत.
शहरातील सर्वात मोठी बाजारपेठेत सध्या पांढरे कांदे विक्रीसाठी आले आहेत. त्यामुळे त्याच्या विक्रीसाठी उरणकरांकडून गर्दी केली जात आहे. उरण बाजारात हा कांदा राजपाल नाका, गांधी चौक, बाजार पेठ, सिटीझन कॉलेज आदी ठिकाणी विक्री केला जात आहे. त्याच्या माळानुसार दर ठरविले जातात. मोठी सफेद कांद्याची माळ २०० ते २५० रुपये प्रमाणे तर छोटी माळ १५० रुपये प्रमाणे विकली जात आहे. अलिबागमध्ये भात शेती मुख्य व्यवसाय आहे. शेतीची कामे आटोपल्यानंतर जोड व्यवसाय म्हणून तालुक्यातील मानेपुते, तळवली, खंडाला, नेवली, कार्ला खिंड, वाडगाव, खानाउसर, सानगोटी आदी गावामध्ये सफेद कांद्याची लागवड केली जाते. सफेद कांद्याला या परिसरातील पोषक वातावरण आणि इतर कांद्यापेक्षा मागणी ही मोठी असते. शिवाय उत्पन्न ही जास्त मिळत असल्याने हा कांदा सर्वाधिक पिकवला जातो. या वर्षी कृषी विभागाने सफेद कांदा लागवडीचे क्षेत्र वाढविण्याकडे भर दिला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.