धमकीच्या फलकामुळे स्थानिकांमध्ये नाराजी
टिटवाळा, ता. १२ ( वार्ताहर) : एका बंद दुकानाच्या शटरवर लावलेला इशारा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘इथे गाड्या लावू नका, अन्यथा गाडी तोडण्यात येईल किंवा जाळण्यात येईल,’ असा मजकूर असलेल्या फलकामुळे स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक ठिकाणी पार्किंगबाबत सूचना करू नये; मात्र अशा प्रकारे सरळ धमकीवजा मजकूर लिहिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते अशा प्रकारच्या फलकांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
धमकी देणारे फलक लावल्याने प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. परिसरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. टिटवाळा आणि बल्याणी भागात परप्रांतीयांची मोठ्या प्रमाणात वस्ती वाढत आहे. त्यामुळे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चोरी, मारहाण, महिलांची छेडछाड, आर्थिक फसवणूक, टोळक्यांकडून दहशत माजवणे यांसारख्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. व्यसनाधीन आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी परिसरात थैमान घातल्याने स्थानिक रहिवासी भयभीत झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.