मुंबई

उन्हाच्या वाढत्या झळांपासून सावधानता बाळगा

CD

जव्हार, ता. १२ (बातमीदार) : निसर्गसौंदर्याने नटलेल्या जव्हार तालुक्यात झालेली बेसुमार वृक्षतोड, निसर्गाचा लहरीपणा या बाबींमुळे वातावरणात बदल जाणवत आहे. यंदा मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच उन्हाचा चटका जाणवत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात उष्णतेची तीव्र लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. उन्हाचा वाढलेला तडाखा बघता सामान्य जनतेने काळजी घ्यावी, असे आवाहन जव्हार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक मानिनी कांबळे यांनी नागरिकांना केले आहे.

फेब्रुवारीच्या अखेरीस राज्यातील सरासरी तापमानात तीन ते चार अंशांची वाढ झाली. त्यामुळे जव्हारचा पारा थेट ३७ अंशांपर्यंत जाऊन पोहोचला. वाढलेल्या तापमानावरून यंदाचा उन्हाळा अधिक कडक असणार, याचा अंदाज आला. त्यातच मागील दोन दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (ता. १०) जव्हारचा पारा ३७ अंशावर स्थिरावला. उकाड्यात झालेली वाढ लक्षात घेता जव्हार नगर परिषद प्रशासन तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT