मुंबई

नैसर्गिक रंगाचाच वापर करावा

CD

वाणगाव, ता. १२ (बातमीदार) : होळी, तसेच धुलिवंदन साजरी करीत असताना प्रत्येकाने नैसर्गिक रंगाचाच वापर करावा. रासायनिक रंगांचा वापर करू नका. पाण्याचा अपव्यय टाळत त्याचे संवर्धन करा, असा संदेश कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल येथे आयोजित पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग बनविण्याच्या कार्यशाळेत प्रतिपादन केले.

कार्यशाळेत युवकांना रासायनिक रंगाच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम व नैसर्गिक रंग वापरण्याचे महत्व यावर माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्राच्या गृह विज्ञान शास्त्रज्ञ रुपाली देशमुख यांनी प्रत्येकाने कुठलाही सण साजरा करताना पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. होळी, तसेच धुलिवंदन साजरा करत असताना पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग वापरणे आवश्यक आहे व आपण इतरांनाही नैसर्गिक रंग वापरण्याविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे, त्यामुळे रासायनिक रंगाचा वापर कमी होऊ शकतो. निसर्गातील पाने, फुले, फळे, भाज्या यांचा वापर करून रंग कसे बनवता येतात, याबाबत प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन केले. यामध्ये पालकाच्या पानापासून हिरवा रंग, बिट पासून लाल रंग, झेंडू फुलापासून पिवळा रंग कसा बनवतात, हे युवकांना शिकविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

Latest Marathi News Live Update: अमरावती प्रकरणात 8 व्हिडिओ समोर; अल्पसंख्याक आयोगाचा तपास सुरू

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 1,300 अंकांनी वाढला; Vedanta Limited शेअर्स चर्चेत

SCROLL FOR NEXT