ठाणे-नवी मुंबईत अवजड वाहनांना बंदी
वर्ल्ड बिगेस्ट होळी कार्यक्रमानिमित्त पोलिसांचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ ः नवी मुंबईमध्ये धुळवडीच्या दिवशी गायक मार्टीन गॅरीक्स यांचा वर्ल्ड बिगेस्ट होळी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नवी मुंबईत खासगी वाहने येणार असल्याने शुक्रवारी (ता. १४) दुपारी दोन ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनांना ठाण्याच्या वेशीवरच अडवण्यात येणार आहे.
--------------------------------
प्रवेश बंदीची ठिकाणे
कासारवडवली- मुंबई, वसई, विरारकडून घोडबंदर मार्ग दिशेने ठाणेकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना फाउंटन हॉटेलजवळ प्रवेश बंदी.
कळवा- बाळकुम- साकेत- नवीन कळवा ब्रिजवरून कळवा नाक्याकडून विटावामार्गे मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना कळवा नाका येथे प्रवेश बंदी.
मुंब्रा- पनवेलकडून कल्याण शिळफाटामार्गे महापेकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना भिवंडी- कल्याण रोडवर प्रवेश बंदी.
नारपोली- गुजरातकडून घोडबंदर मार्ग दिशेने ठाण्याकडे येणाऱ्या जड- अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंदी.
कल्याण- ठाणे ग्रामीण बापगावकडून जेएनपीए नवी मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना गांधारी नाका येथे प्रवेश बंदी.
कोळशेवाडी- बदलापूर अंबरनाथकडून बदलापूर पाइपलाइनमार्गे तळोजा बायपास रोडने येणाऱ्या वाहनांना खोडी निसर्ग नाका येथे प्रवेश बंदी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.