मुंबई

कर भरणासाठी खोपोलीत रांगा

CD

खोपोली, ता. १८ (बातमीदार) ः मार्चअखेरपर्यंत जास्तीत जास्त करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी खोपोली नगरपालिकेकडून मालमत्ता व पाणीपट्टी करवसुलीसाठी जोरदार मोहीम राबवण्यात येत आहे. नागरिकांकडूनही मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून, कर भरणा करण्यासाठी पालिकेत रांगा लागत आहेत.
पालिकेकडून थकबाकीदारांना नोटिसा बजावणे, नळजोडणी खंडित करणे आदी कारवाईही सुरू करण्यात आली आहे. कर भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी शहरातील विविध रहिवासी भागात विशेष वसुली पथक नियुक्त करून कॅम्प लावून वसुली मोहीम तीव्र केली जात आहे. पालिका कार्यालयातही पाणीपट्टी व मालमत्ता कर भरणा सुरळीत व्हावा म्हणून अतिरिक्त खिडक्या सुरू केल्‍या आहेत. यात रोख रक्कम, धनादेश व डेबिट कार्ड व ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्‍ध करून दिली आहे. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी लवकरात लवकर कर भरणा करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आठ दिवसांत दररोज सरासरी १० लाखांच्या वर करवसुली होत असल्याचे वसुली अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोणतीही अप्रिय कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी तातडीने पाणीपट्टी व मालमत्ता कर भरावा. वर्षानुवर्षे थकबाकी असलेल्‍या मालमत्ताधारकांकडून विकसक व औद्योगिक क्षेत्रातील थकबाकीदारांकडून करवसुलीसाठी नगरपालिकेकडून मोहीम तीव्र करण्यात आली आहे. कर भरा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा निर्वाणीचा इशारा नोटिशीद्वारे थकबाकीदारांना देण्यात आला आहे.
- डॉ. पंकज पाटील, मुख्याधिकारी, खोपोली

खोपोली : कर भरणा करण्यासाठी पालिका कार्यालयात गर्दी होत आहे.

(छायाचित्र : अनिल पाटील )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Qualifier 1: विराट कोहलीने GT विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ची चिंता वाढवली... समोर आले धक्कादायक अपडेट्स

चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित 'गव्हर्नर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! मनोज वाजपेयींची मुख्य भूमिका

Alandi Temple Security : आळंदीतील दानपेटी चोरी प्रकरणानंतर देवस्थान प्रशासन सतर्क: व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांकडून खुलासा

Eid Al-Adha 2026: भारतात बकरी ईद 27 मे की 28 मे रोजी साजरी होणार? जाणून घ्या नेमकी तारीख आणि भारतात कुठे, कशी साजरी होते ईद

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

SCROLL FOR NEXT