तुर्भे, ता. १८ (बातमीदार) : तुर्भे येथील अनधिकृत पार्किंग आणि गॅरेजवर महापालिकेसह वाहतूक पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली. वाशी-तुर्भे लिंक मार्गावर अनधिकृत पार्किंग आणि गॅरेजवाल्यांचा उपद्रव या आशयाचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. याची दखल घेत महापालिका व वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.
वाशी-तुर्भे लिंक मार्गावर तुर्भे उड्डाणपूल ते अरेंजा चौकापर्यंत अनधिकृत पार्किंग आणि गॅरेजवाल्यांनी त्यांचे बस्थान मांडले होते. यामुळे वाहतूक कोंडी आणि पादचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. यामुळे स्वच्छ भारत अभियानाच्या उपक्रमातही बाधा निर्माण होत होती. एपीएमसी वाहतूक शाखेच्या वतीने तुर्भे सेक्टर २०, २१, १८ या परिसरात नो पार्किंगच्या ठिकाणी वाहने लावणाऱ्या ९० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमध्ये एक लाखाहून अधिक दंडाची वसुली करण्यात आली. दोन गॅरेजचालकांवर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. यामध्ये गुलशन आलम, पटेल यांच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती एपीएमसी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांनी दिली. भांडवलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार सुभाष हिले, परमेश्वर पडळकर, म्हात्रे, किर्वे, बनकर यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
---------------
वाहनांना जामर लावून दंड
महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रबोधन मवाडे यांनी एपीएमसी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने अरेंजा चौक येथील अनधिकृत बस पार्किंगवर कारवाई केली. मवाडे यांच्या नेतृत्वाखाली लिपिक कुंदन पुराडकर यांनी अतिक्रमण विरोधी पथकाच्या माध्यमातून अरेंजा चौक ते कांदा बटाटा मार्केट गेट क्रमांक दोनपर्यंतच्या अनधिकृत बस आणि ट्रक यांच्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये त्यांनी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांना जामर लावण्यात आला. त्यांच्याकडून ३२ हजारांहून अधिक रकमेची दंडात्मक कारवाई केली. अतिक्रमणविरोधी विभागाचे उपायुक्त भागवत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही ही कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यात येणार आहे, अशी माहिती मवाडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.