डोंबिवली, ता. १८ (बातमीदार) : लोकराज्य महाभियान आयोजित महाकुंभतीर्थ दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. डोंबिवलीच्या विवेकानंद सोसायटीमध्ये महाकुंभ कलशाचा महाआरती सोहळा आयोजित केला होता. कलशपूजनाचा मान सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आला. डोंबिवली पूर्वेतील विवेकानंद सोसायटीत सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत कलश दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन अनुगामी संस्था आणि भाजपच्या माजी नगरसेवक खुशबू चौधरी यांनी केले होते. महाकुंभ मेळाव्यात ज्यांना कोणत्या कारणाने जायला मिळाले नाही, त्यांच्यासाठी महाकुंभ कलश दर्शनचे डोंबिवलीत आयोजन केले आहे. अनुलोम संस्थेने जे कलश महाराष्ट्र राज्यासाठी पाठवले होते, त्यातील एक कलश शनिवारी (ता. १५) डोंबिवलीत दर्शनासाठी ठेवला होता. त्याची पूजा-अर्चा करून महाआरती झाली. अनुलोम संस्थेमुळे नागरिकांना कलशपूजन करता आले. ४०० नागरिक महाआरतीसाठी उपस्थित होते. शंखनाद, गंगापूजन आणि महाप्रसादाचे आयोजन केले होते. संस्थेचे पंकज येवले म्हणाले, महाराष्ट्रात १७२ ठिकाणी कलशपूजनाचे आयोजन केले आहे. २० फेब्रुवारी ते २० मार्च या कालवधीत विधानसभा क्षेत्रात या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जे लोक महाकुंभाला जाऊ शकले नाहीत, त्यांना गंगेचे पूजन करता यावे, त्यांच्यासाठी हे कलशपूजन आहे. विवेकानंद सोसायटीत गंगापूजन कार्यक्रम खुशबू चौधरी यांनी आयोजित केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.