ठाणे, ता.१८ ः ‘मिशन शंभर दिवस’ उपक्रमांच्या मूल्यमापन फेरीत पहिला क्रमांक पटकावल्यानंतर ठाणे महापालिकेने एप्रिलमध्ये होणाऱ्या अंतिम फेरीसाठी कंबर कसली आहे. याच अनुषंगाने महापालिकेने विविध नावीन्यपूर्ण उपक्रमातून वेळखाऊ प्रक्रिया सोप्या आणि जलद करण्यावर भर दिला असून, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांना गती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ‘मिशन शंभर दिवस’ उपक्रमाच्या प्राथमिक मूल्यमापन फेरीत ठाणे महापालिकेने पहिला क्रमांक पटकावला आहे. या उपक्रमाची अंतिम मूल्यमापन १७ ते २८ एप्रिल काळात होणार आहे. यासंदर्भात आढावा घेण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसेच विभाग प्रमुखांची बैठक आयुक्त सौरभ राव यांनी घेतली होती. या वेळी नागरिकांच्या विविध सुविधांचा आढावा घेण्यासाठी संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, नागरी तक्रार निवारण, कार्यालयीन सोयीसुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, ई ऑफिस प्रणाली, उद्योगांना गुंतवणुकीस प्रोत्साहन, प्रशिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर देण्याचे निर्देश विभाग प्रमुखांना देण्यात आले. तसेच मूल्यांकनाचे जास्तीत जास्त गुण मिळतील या दृष्टीने कार्यवाही करावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
-------------------------------------------
बेकायदा बांधकामांवर कठोर कारवाई
अनधिकृत बांधकामांविषयी महापालिकेची भूमिका स्पष्ट असून, राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या नियमावलीच्या आधारे सर्व सहाय्यक आयुक्तांनी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे यांच्या विरोधात काटेकोर कारवाई करावी, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीतील प्रमुख मुद्द्यांची माहिती बैठकीत दिली.
----------------------------------------------
अधिकाऱ्यांना ‘माझी वसुंधरा’ची प्रतिज्ञा
राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ मोहिमेंतर्गत सर्व नागरिकांनी ई-प्रतिज्ञा घेणे अपेक्षित आहे. त्याची सुरुवात पर्यावरण विभागाने विविध विभागांच्या मदतीने केलेली आहे. त्याच दृष्टीने सोमवारी झालेल्या बैठकीत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपापल्या मोबाईलवर ई-प्रतिज्ञा घेतली. नागरिकांनीही
https://majhivasundhara.in/en/lets-pledge या वेबसाईटवर ई-प्रतिज्ञा घ्यावी, असे आवाहन यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी केले.
------------------------------------------------
शिक्षण विभागाच्या विशेषांकाचे प्रकाशन
ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने वर्षभरात केलेल्या कामगिरीचा तसेच सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवाचा आढावा घेणाऱ्या विशेषांकाचे प्रकाशन या बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. उपायुक्त सचिन सांगळे यांनी विशेषांक आयुक्त राव यांच्याकडे सुपूर्द केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.