डोंबिवलीकर लुटणार देश-विदेशातील सहलीचा आनंद
थॉमस कुक आयोजित कार्निवलला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ (बातमीदार) : परीक्षांचा हंगाम संपून लवकरच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत. घराघरात यंदा सहलीला कोठे जायचे, याबाबत बेत आखले जात आहेत. मुंबईत उन्हाचा तडाखा जास्त असल्याने थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटक पसंती देत आहेत. काश्मीर, लेह, लडाख यांना जास्त पसंती मिळत असून, यासोबतच परदेशातील बाली, सिंगापूर, मालदीव, थायलंड, जपान यासारख्या देशांत जाण्याकडे पर्यटकांचा कल आहे. डोंबिवलीकरांनी ‘सकाळ’ आणि थॉमस कुकने आयोजित केलेल्या हॉलिडे कार्निवलला उत्स्फूर्त हजेरी लावत त्यांनी आपल्या सहलींचे बुकिंगही केले.
उन्हाळी सुट्टीत कुटुंबीयांसोबत सहलीला जाण्याचा बेत अनेकांनी आखायला सुरुवात केली आहे. परीक्षांच्या तयारीसोबतच फिरायला कोठे जायचे, यासाठी ठिकाणांची शोधमोहीम पालकांनी सुरू केली आहे. सहलीला तर जायचे पण कोणती ट्रॅव्हल्स कंपनी योग्य माहिती, योग्य पॅकेज देईल, आपली फसवणूक तर होणार नाही ना, यांसारखे अनेक प्रश्न पर्यटकांच्या डोक्यात गर्दी करीत असतात. पर्यटकांची ही गरज ओळखून ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘थॉमस कुक’ने रविवारी (ता. १६) डोंबिवलीमधील जिमखाना येथे हॉलिडे कार्निवल आयोजित केला होता. या कार्यक्रमाला डोंबिवलीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. या ठिकाणी सहलीची माहिती घेण्यासाठी आलेल्यांनी थॉमस कुकच्या व्यवस्थापक टीमकडून टुरबरोबरच पासपोर्ट, व्हिसा आदीविषयी आपल्या शंकांचे निरसन केले. या वेळी उपस्थिताना देश-विदेशातील पर्यटन ठिकाणांची माहिती देण्यात आली.
पर्यटनाची माहिती व धम्माल मस्ती
हॉलिडे कार्निवलला कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भेट दिली. या वेळी त्यांना ऑडिओ, व्हिडिओच्या माध्यमातून देश, विदेशातील पर्यटनस्थळांची माहिती देण्यात आली. येथे आलेल्या नागरिकांना ‘स्पीन द व्हिल’ नामक खेळात पर्यटनावर आधारित प्रश्न विचारून कार्निवलमध्ये रंगत आणली गेली. प्रश्नांची उत्तरे बरोबर देणाऱ्यांना बक्षिसेही देण्यात आली. या वेळी ‘ऑन द स्पॉट’ सहल बुक करणाऱ्यांना एक ग्रॅम सोन्याच्या नाण्यासह भरघोस ऑफर देण्यात आल्या. बाय वन गेट वन फ्री, एका हॉलिडेवर दुसऱ्या वर्षीचा हॉलिडे मोफत, हॉलिडे पॅकेजेसवर सूट, फॅमिली आणी ग्रुप डिस्काउंट, ट्रॅव्हल इन्शुरन्सबद्दल माहिती, ईएमआय ऑप्शन्स आणि आयसीआयसीआय बँकेडून स्पेशल ऑफर अशा आकर्षक सवलती नागरिकांना देण्यात आल्या. सुट्टी आणि बजेटनुसार थॉमस कुकच्या टीमने येथे आलेल्यांना पुरेसा वेळ देत त्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले.
ऑफरमध्ये दोन दिवसांची वाढ
लोकांच्या आग्रहानुसार थॉमस कुकने खास पर्यटकांसाठी ऑफरमध्ये दोन दिवसांची वाढ केली आहे. कल्याण-डोंबिवलीमधील थॉमस कुकच्या कार्यालयात जाऊन पर्यटकांना या ऑफरचा लाभ घेता येईल. जास्तीत जास्त कल्याण डोंबिवलीकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.
हॉलिडे कार्निवलसारख्या कार्यक्रमामुळे अनेकांना त्यांच्या आगामी सुट्ट्यांचे नियोजन करण्यासाठी मदत मिळते. तसेच विविध पर्यटनस्थळांची माहिती आणि विशेष सवलतींचा लाभ घेण्याची संधीही मिळते.
- प्रकाश मोहिते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.