मुंबई

वालधूनी नदीतून २०० टन कचरा हटवला

CD

वालधुनी नदीतून २०० टन कचरा हटवला
दुर्गंधीतून दिलासा; महापालिकेची स्वच्छता मोहीम तेजीत

उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : वालधुनी नदी काही वर्षांपासून प्रदूषण आणि दुर्गंधीच्या विळख्यात अडकली आहे. आता या नदीच्या स्वच्छतेसाठी उल्हासनगर महापालिकेने पुढाकार घेतला आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या पुढाकाराने नदीचे रूप पालटू लागले आहे. नदीपात्रातून जवळपास २०० मेट्रिक टन कचरा हटवण्यात आला आहे.

वालधुनी नदी ही अंबरनाथ एमआयडीसी परिसरातून वाहत उल्हासनगरमधील वडोलगाव, सम्राट अशोक नगर, राजीव गांधी नगर, उल्हास स्थानक, टिळकनगर, हिराघाट व शांती नगरमार्गे कल्याण खाडीला मिळते; मात्र गेल्या काही वर्षांपासून या नदीपात्रात एमआयडीसी परिसरातील औद्योगिक कचरा, रसायने व सांडपाणी सोडले जात असल्याने नदीतील पाणी अतिशय प्रदूषित झाले होते. परिणामी आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत सार्वजनिक आरोग्य विभागाला नदीपात्राच्या स्वच्छतेच्या सूचना दिल्या.

८ मार्चपासून वडोलगाव ते राजीव गांधी नगर आणि छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलादरम्यान पोकलेन मशीन व इतर यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने व्यापक स्वरूपात नदीची साफसफाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान सुमारे २०० मेट्रिक टन गाळ, प्लॅस्टिक व अन्य कचरा नदीतून बाहेर काढण्यात आला. ही मोहीम केवळ एक टप्पा असून, राजीव गांधी नगर ते उल्हास स्टेशन या दुसऱ्या टप्प्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या संपूर्ण उपक्रमाचे स्थानिक नागरिक व नदी संवर्धन समितीने स्वागत केले आहे.

वालधुनी नदीची स्वच्छता मोहीम ही पर्यावरण व आरोग्य रक्षणाचा एक प्रयत्न आहे. नागरिकांनीदेखील नदीत कचरा टाकू नये. आपला कचरा घंटागाडीतच द्यावा आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: इराणच्या युद्धात मुंबईच्या तरुणाचा मृत्यू; ड्रोन हल्ल्यात भारतातील तिघे ठार

Mumbai News: व्हॉट्सॲप चॅट घटस्फोटाचे कारण असू शकत नाही - उच्च न्यायालय

४० दिवसांपासून कांदा ७ ते १० रुपये किलो कांद्याला प्रतिक्विंटल ५०० ते १००० अनुदानाची मागणी; सोलापूर ‘एपीएमसी’त १४९२८ ट्रक कांदा विकून शेतकऱ्यांना मिळाले अवघे ११८ कोटी

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

Nandurbar News : काठीच्या राजवडी होळीचे होणार जागतिक ब्रँडिंग; आदिवासी विकास मंत्र्यांनी धडगावच्या भोंगऱ्या बाजारात धरला ठेका!

SCROLL FOR NEXT