मुंबई

खारघरमध्ये पादचाऱ्यांची कोंडी

CD

खारघरमध्ये पादचाऱ्यांची कोंडी
पदपथांवर दुकानदारांचे अतिक्रमण; मार्जिनल स्‍पेसचा गैरवापर
खारघर, ता. २७ (बातमीदार) : खारघरमध्ये दुकानांसमोरील मार्जिनल स्पेस तसेच पदपथावर अतिक्रमण करण्यात आल्याने पादचाऱ्यांची कोंडी होत आहे. नागरिकांना चालण्यासाठी पदपथ मिळत नसल्याने पालिकेने अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पालिकेच्या खारघर प्रभाग कार्यालयाअंतर्गत स्वतंत्र अतिक्रमण पथकाची निर्मिती करण्यात आली आहे, मात्र नियमितपणे कारवाई केली जात नसल्यामुळे खारघरमध्ये दुकानदारांकडून आपल्या गाळ्यांसमोरील पदपथ आणि ‘मार्जिनल स्पेस’चा ताबा घेण्यात आला आहे. दुकानदारांच्या या अतिक्रमणाकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने पादचाऱ्यांची कोंडी होत आहे. खारघरमध्ये मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली आहे. त्‍यातच जागेचे भावदेखील गगनाला भिडले आहेत. त्‍यामुळे शक्‍यतो अनेक व्‍यावसायिकांकडून लहान दुकाने भाड्याने घेऊन उर्वरित माल दुकानाबाहेरील मार्जिनस स्‍पेसमध्ये सर्रास लावला जात आहे, तर काही दुकानदारांकडून चक्‍क पदपथावरच माल विक्रीसाठी ठेवण्यात आलेला आहे. यामुळे सकाळ-संध्याकाळ पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले आहे. पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने ही मार्जिनल स्‍पेस दुकानदारांना आंदण दिल्यासारखी परिस्‍थिती खारघरमध्ये पाहायला मिळत आहे. पनवेल महापालिका अस्‍तित्‍वात आल्यानंतर तत्कालीन पालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी पालिका हद्दीत मोहीम राबवून पदपथ आणि दुकान समोरील मार्जिनल स्पेसवर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदार आणि व्यापारीवर्गावर दंडात्मक कारवाई केली होती. त्यामुळे पदपथ आणि मार्जिनल स्पेस मोकळे झाले होते. देशमुख यांच्या बदली झाल्यानंतर पालिकेकडून कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.
..........................
वाहनांच्‍या वर्दळीतून मार्ग
खारघर सेक्टर १५ डी-मार्टकडून सेक्टर १८ कडे जाणाऱ्या रस्त्याचा कडेला स्वीट मार्ट, हार्डवेअर, रेडिमेड कापड, अशी अनेक दुकाने असून, येथील मार्जिनल स्पेस आणि पदपथावर अनधिकृतपणे व्यवसाय थाटण्यात आला आहे. अशीच अवस्था सेक्टर १२, हिरानंदानी इमारतीसमोरील पदपथ तसेच उत्सव चौककडून डेली बाजारकडे जाणाऱ्या रस्त्याचा कडेला दिसून येत आहे. पदपथ आणि मार्जिनल स्पेसवर दुकानदारांनी कब्जा केल्यामुळे पादचाऱ्यांना वाहनांच्या वर्दळीतून मार्ग काढावा लागत आहे.
.........................
दुकानदारांना दुकानासमोरील अडीच फूट जागेवर व्यवसायास परवानगी देण्यात आली आहे, मात्र नागरिकांना त्रास होत असेल, तर दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
-जितेंद्र मढवी, प्रभाग अधिकारी, खारघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs DC Live: 'Vaping'चा वाद अन् पेटला रियान पराग! ८ चौकार, ५ षटकारांसह कुटल्या ९० धावा... राजस्थान रॉयल्सने उभे केले तगडे लक्ष्य

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT