मुंबई

दिघा येथील पाणपोई पाण्याविना

CD

दिघा येथील पाणपोई पाण्याविना
ऐन उन्‍हाळ्यात नागरिकांची गैरसोय
वाशी, ता. २७ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रात स्वच्छ भारत अभियानअंतर्गत शहरामध्ये सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्‍याअंतर्गत उन्हाळ्यामध्ये वाटसरूंना पिण्याच्या पाण्यासाठी दिघा विभागातील चौकामध्ये पालिकेकडून पाणपोई उभारण्यात आली आहे. मात्र या पाणपोईकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले आहे. या पाणपोईमध्ये पाणी नसल्याने ऐन उन्‍हाळ्यात नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या पाणपोईच्या देखभालीकडे पालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सद्य:स्थितीत कडक उन्हाळा सुरू झाला आले. त्‍यामुळे राज्यासह नवी मुंबईत उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. दुपारच्या वेळी तर अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे तहान जास्त प्रामणात लागत आहे. उष्म्यामुळे आजारी पडणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्‍यामुळे या दिवसांत डॉक्टरांकडून जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो. अशावेळी कामानिमित्त घराबाहेर पडणार्या नागरिकांचा कल जास्‍तीत जास्‍त पाणी पिण्याकडे असतो. खासगी मिनरल वॉटर घेणे सर्वसामन्यांना परवडत नसल्यामुळे ते पाणपोईचा आधार घेतात. त्‍यामुळे अशा सर्वसामान्य नागरिकांसाठी पालिकेने शहरातील अनेक चौकांत पाणपोई बसविली आहे. त्‍याच्‍या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक पाणपोईची दुरवस्‍था झाली आहे. अशाच प्रकारे दिघा येथील पाणपोईत पाणी नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्‍यामुळे ही पाणपोई कशासाठी बसवली आहे, असा सवाल वाटसरूंकडून करण्यात येत आहे. या पाणपोईमध्ये दररोज पाणी भरावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. यासंदर्भात विभाग आधिकारी भरत धांडे यांच्याशी संपर्क साधण्या प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही.
.....................
दिघा येथील चौकात महापालिकेकडून पाणपोई बसविण्यात आली आहे. या पाणपोईला पाणीच नसल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे नाइलाजास्तव हॉटेल किंवा मिनरल वॉटरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो. त्‍यामुळे पाणपोई सुरू करण्यात यावी.
- रमेश सूर्यवंशी, नागरिक
.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

Latest Marathi News Live Update : पाषाण तलावातील मृत मासे प्रकरण! महापौरांचा दौरा, प्रदूषण रोखण्यासाठी तातडीचे आदेश

गरोदर असूनही ‘राका’मध्ये दिसणार दीपिका पादुकोण करणार अ‍ॅक्शन सीन ! अभिनेत्रीची विशेष मेहनत

‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’मध्ये मराठमोळ्या श्वेता साकोडेची दमदार एन्ट्री; महाराष्ट्रीयन पदार्थांनी जिंकली परीक्षकांची मनं

Management Education: मॅनेजमेंट शिक्षणातील 'जेंडर गॅप': महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी बिझनेस स्कूल्स उचलत आहेत मोठी पावले

SCROLL FOR NEXT