अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल पंधरवड्यात?
अभय कुरुंदकरसह सर्व आरोपींच्या भवितव्याचा फैसला
पनवेल, ता. २७ (वार्ताहर) : सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल येत्या पंधरवड्यात लागणार आहे. पनवेलचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्याकडे शुक्रवारी (ता. २८) सुनावणी होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या खटल्यातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह अन्य आरोपींच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
मागील सात वर्षांपासून या खटल्याची अलिबाग आणि पनवेल न्यायालयात मॅरेथॉन सुनावणी सुरू होती. या प्रकरणाचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया पनवेल सत्र न्यायालयात अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या खटल्यात न्यायालयाने ८० साक्षीदार तपासले आहेत. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात या खटल्याचा निकाल लागणार असल्याचा अंदाज विधितज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याने मिरा रोड येथील घरी अश्विनी बिद्रे यांची हत्या केली होती. या हत्याकांडासाठी राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांनी मदत केली. या सर्वच आरोपींच्या भवितव्याचा फैसला आता होणार आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीप घरत यांनी तर आरोपींची बाजू अॅड. विशाल भानुशाली आणि प्रसाद पाटील यांनी मांडली आहे.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.