बड्या थकबाकीदारांकडे
महापालिकेची पाठ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मुंबईतील विविध प्राधिकरण, संस्था, शासकीय तसेच निमशासकीय संस्था आणि विकसक तसेच गृहनिर्माण संस्था यांच्याकडे अजूनही मालमत्ता कराची मोठी थकबाकी आहे. त्याकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.
जकात हा पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता. जकातीपासून मिळणाऱ्या सुमारे नऊ हजार कोटी रुपयांवर पालिकेला पाणी सोडावे लागले. आता मालमत्ता करावर पालिकेची सर्व मदार आहे. मालमत्ता कर हाच पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत ठरला आहे. त्यामुळे पालिकेने मालमत्ता कराच्या संकलनावर लक्ष केंद्रित केले आहे. सुमारे पाच हजार कोटी रुपये मालमत्ता कराची थकबाकी मोठ्या बिल्डरांकडे आणि मोठ्या व्यावसायिक आस्थापनांकडे आहे. महापालिका प्रशासनाला उत्पन्न वाढवायचे असेल, तर सुमारे पाच हजार कोटी रुपये मालमत्ता कराची थकबाकी मोठ्या बिल्डरांकडे आणि मोठ्या व्यावसायिक आस्थापनांकडे आहे. थकबाकी वसुली करावी. वेळेस मालमत्ता करणाऱ्या या बड्या थकबाकीदारांची संपत्तीदेखील जप्त करावी, अशी मागणी पालिका आयुक्तांकडे पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. मोठ्या थकबाकीदारांना पालिका प्रशासन का संरक्षण करीत आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.