मुंबई

डोंबिवलीमध्ये समृद्ध संस्कृतीचा जागर

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० : श्री गणेश मंदिर संस्थानच्या वतीने आयाेजित २७ वर्षांची परंपरा असलेल्या डोंबिवली शहरात रविवारी (ता. ३०) हिंदू नववर्षानिमित्त भव्य स्वागत यात्रा काढण्यात आली. या वेळी नागरिक पारंपरिक पेहरावात स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. लेझीम, ढोल-ताशा पथकांच्या गजरात स्वागत यात्रा निघाली हाेती. चौकात जागोजागी स्वागत यात्रेवर पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात येत होते. या यात्रांच्या माध्यमातून डोंबिवलीमध्ये समृद्ध संस्कृतीचे संवर्धन आणि पर्यावरणाचा जागर करणारे चित्ररथ सजविण्यात आले होते.

डोंबिवलीतील श्री गणेश मंदिरात रविवारी पहाटे नववर्षानिमित्त आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत गणेश मंदिरात मूर्तीचे पूजन करण्यात आले. डोंबिवलीत भागशाळा मैदान येथे वृंदावनचे धर्मप्रसारक महंत आचार्य प्रणय महाराज यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. स्वागत यात्रेत भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, दीपेश म्हात्रे यांसह मान्यवर सहभागी झाले होते. यासोबतच दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सूरज चव्हाण यांसह अनेक कलाकार मंडळी सहभागी झाली होती. डोंबिवलीतील फडके रोड तरुणाईने गजबजून गेला होता.

गुलाब पुष्पाने स्वागत
पंडित दिनदयाळ रस्त्यावर मुस्लिम समाजातर्फे स्वागत यात्रेतील सहभागींचे गुलाब पुष्प देऊन, पुष्पवृष्टी करून स्वागत केले गेले. बालगोपाळ, महिला, पुरुष पारंपरिक पेहरावात सहभागी झाले होते. शहरातील आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रात काम करणारी मंडळे स्वागत यात्रेत सहभागी झाली होती.

‘सकाळ’कडून जागृती
सकाळ माध्यम समूहाचा चित्ररथदेखील डोंबिवली नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी झाला होता. वाचकांना उत्तम दर्जाचे लेखन ‘सकाळ’मधून मिळत असते. वाचकांशी नाळ अधिक घट्ट व्हावी, यासाठी या चित्ररथातून संदेश देण्यात आला.

शीतपेयाची सुविधा
उन्हाचा तडाखा गेल्या काही दिवसांपासून वाढला असून, सूर्य डोक्यावर आग ओकत असताना ही नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी जागोजागी पाणी, शीतपेयाची सुविधा करण्यात आली होती.

सिद्धार्थ जाधवकडून ढोल वादन
सिद्धार्थ जाधव याने ढोल वादन करून ढोल-ताशा पथकांचा उत्साह द्विगुणित केला. डोंबिवलीमधील नववर्ष स्वागत यात्रेविषयी आतापर्यंत ऐकून होतो, पण आज याचा अनुभव घेतला असता एक वेगळाच उत्साह, जल्लोष पाहायला मिळाला. या एनर्जीने आम्हीदेखील भारावून गेलो असल्याची प्रतिक्रिया या वेळी कलाकारांनी व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : मुख्यमंत्री मद्यप्राशन करून विधानसभेत पोहोचले? अकाली दलने शेअर केला व्हिडीओ, डोपिंग टेस्टची मागणी...

Thane: ठाण्यात पहिल्यांदाच डबल डेकर बस धावणार, कधीपासून प्रवाशांच्या सेवेत येणार?

Crime: जमिनीच्या वादातून तरुणाला संपवलं; नंतर मृतदेहाची जंगलात विल्हेवाट, ठाण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला अटक, १२ वर्षांनी गूढ उलगडलं

Latest Marathi News Live Update : चंद्रपूर वीज केंद्रात पाचशे मेगावॉट वीजनिर्मिती ठप्प

Anewadi Toll Traffic Jam : पुणे-बंगळुरू हायवेवर 5 किमीच्या रांगा! आनेवाडी टोलवर मुंबई–पुण्यातील चाकरमानी अडकले; सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर प्रचंड गर्दी

SCROLL FOR NEXT