आर्य समाजाची जगभर वाढ व्हावी : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
वाशी, ता. ३० (वार्ताहर) : नवीन वर्षाची सुरुवात उत्साह आणि नवीन ऊर्जा घेऊन होते. याच कारणामुळे स्वामीजींनी नवीन कार्य सुरू करण्यासाठी गुढीपाडव्यासारख्या दिवसाची निवड केली असावी, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले. तसेच दीडशे वर्षांच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्य समाजाचा जगभर विस्तार व्हावा आणि त्यांची विचारसरणी संपूर्ण विश्वात पोहोचावी, अशी अपेक्षा पीयूष गोयल यांनी व्यक्त केली.
आर्य समाजाच्या स्थापनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नवी मुंबईच्या वाशीतील सिडको एक्झिबिशन आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे २९ आणि ३० मार्चदरम्यान दोनदिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक कार्यक्रमात आर्य समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी, अनुयायी, समाजसुधारक, विद्यार्थी, शिक्षक आणि देशभरातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. आर्य प्रतिनिधी सभा, मुंबई आणि दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात आर्य समाजाच्या १५० वर्षांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. वेदांच्या तत्त्वांप्रती संस्थेची निष्ठा, सामाजिक समानता आणि राष्ट्र उभारणीतील योगदानाचा विशेष उल्लेख या कार्यक्रमात करण्यात आला. तसेच, संस्थेचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यात आली. या अधिवेशनादरम्यान गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, अखिल भारतीय दयानंद सेवा संघाचे अध्यक्ष एस. के. आर्य, ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.