मुंबई

तळोज्यातून १८ लाखांचे एमडी जप्त

CD

तळोज्यातून १८ लाखांचे एमडी जप्त
नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : अमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी (ता. ३) पहाटे तळोजा येथील कोयनावेळे गावातील एका घरावर छापा मारून तब्बल १८ लाख ४५ हजार रुपये किमतीचे एमडी (मेफेड्रॉन) जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अहमद फारूख मोटलानी (२६) या आरोपीला अटक केली आहे. त्याला हे अमली पदार्थ पुरवणाऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत.

तळोजा येथील कोयनावेळे गावातील एक व्यक्ती अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्याआधारे अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश धुमाळ आणि त्यांच्या पथकाने गुरुवारी पहाटे ३ वाजता कोयनावेळे गावातील अरिहंत अनायका इमारतीत अहमद मोटलानी राहत असलेल्या चौथ्या मजल्यावरील घरावर छापा मारला होता. या छाप्यात मोटलानीच्या घरात तब्बल १८ लाख ४५ हजार रुपये किमतीचे ७३.८० ग्रॅम वजनाचे एमडी (मेफेड्रॉन) हे अमली पदार्थ आणि ६६ छोट्या आकाराच्या प्लॅस्टिकच्या पारदर्शक पिशव्या सापडल्या. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी पथकाने हे अमली पदार्थ जप्त करून आरोपी अहमद मोटलानी याला ताब्यात घेतले. मोटलानी याच्या चौकशीत त्याला मुंब्रा येथील नुरी रिक्षावाला हा अमली पदार्थाचा पुरवठा करत असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाने तळोजा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अहमद मोटलानी याला अटक केली आहे. पोलिसांनी नुरी रिक्षावाला याचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandoli National Park : चांदोली जंगलात वाघांचे अस्तित्व वाढले; गवे, डुकरं बदलताहेत अधिवास, वनविभाग कोणतं पाऊल उचलणार?

Babar Azam घरगुती वाघ! PSL मध्ये शतक झळकावून केली विराट कोहली, अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी; रोहितला मागे सोडले

Mumbai News: वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी वाईट बातमी! ‘वन नेशन, वन ई-चालान’ महाराष्ट्रात लागू; नियमभंग केला तर थेट दंड

कुर्डुवाडीच्या प्रियांतिकाची सिनेसृष्टीत दमदार एंट्री! ‘फुला’ चित्रपटातून मांडली मुरळीच्या जगण्याची वेदना; चित्रपटाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर अमर देवकर बार्शीचे, वाचा...

ICSE and ISC Result : ‘आयसीएसई’चा ९९.१८ टक्के, तर ‘आयएससी’चा ९९.१३ टक्के निकाल; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे निकाल जाहीर

SCROLL FOR NEXT