वाशी, ता. ९ (बातमीदार) : सिडको भवनमध्ये सिडको एम्प्लॉइज युनियनच्या वतीने मंगळवारी (ता. ८) जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या वेळी पटेल ज्वेलर्सच्या ग्रुपने महिलांच्या विविध स्पर्धा घेतल्या. त्यामध्ये रंगारंग स्पर्धा, ज्वेलरी वापरण्याची कला आदी स्पर्धा पार पडल्या. या वेळी विजेत्या महिलांना मोत्याचे दागिने बक्षीसस्वरूपात देण्यात आल्या. या कार्यक्रमास सिडकोतील ४०० महिला उपस्थित होत्या. या वेळी पटेल ज्वेलर्सतर्फे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक प्रतीक्षा डायस, सिडको एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष नरेंद्र हिरे, सरचिटणीस नितीन कांबळे, प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सिडको व्यवस्थापक (कार्मिक) प्रमदा बिडवे होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनियन महिला प्रतिनिधी माधवी शिंदे, स्वाती पाटील, प्रमिला पाटील व हर्षला पाटील यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.