मुंबई

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

CD

अंबरनाथ, ता. १० (वार्ताहर) : माळी समाज सेवा संस्था क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले उत्स‍व समिती अंबरनाथ यांच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या १९८व्या जयंतीचे आयोजन शुक्रवारी (ता. ११) करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते तथा पहिल्या मुलींची शाळा भिडेवाडाचे आंदोलक अमर शांताई अर्जुन हजारे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ पूर्वेच्या वडवली विभागातील रोटरी क्लब हॉलमध्ये करण्यात आले. यानिमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत. संध्याकाळी महालक्ष्मीनगर ते रोटरी क्लब हॉलपर्यंत भव्य मिरवणूक, दीपप्रज्वलन, मान्यवरांचे स्वागत, विद्यार्थी व कन्यारत्न पुरस्कार वितरण अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे. अमर शांताई अर्जुन हजारे आणि प्राध्यापक अविनाश सुरसे यांचे व्याख्यान प्रवचन उपस्थितांना ऐकायला मिळणार आहे. कार्यक्रमाला नागरिकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

Farmer Protest: कांद्याला भाव नाही, शेतकरी आक्रमक! पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात, चांदवडमध्ये रस्त्यावर रणकंदन

Kolhapur VIP Service: कोल्हापूरसह परराज्यातील तरुणींकडून व्हिआयपी सर्व्हिस, म्हैसाळमधील आलिशान बारवर छापा; नशेत धुंद तरुणांना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT