मुंबई

जुन्या वादातून जमावाकडून बेदम मारहाण

CD

उल्हासनगर, ता. १० (वार्ताहर) : कॅम्प ३ येथील एका विकलांग हातगाडीवाल्याला जुन्या वादातून जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. ९) रात्री घडली आहे. कुलदीप लबाना असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पाच ते सहा जणांच्या जमावाने त्याच्या घरात घुसून बेदम मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे कैद झाला आहे.
कुलदीप हा उल्हासनगरमध्ये पाया सूपची हातगाडी लावतो. काही दिवसांपूर्वी त्याला गाडी लावू नको, असा दम देण्यात आला होता. कुलदीप मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेला असताना त्याच वेळी धमकी देण्यात आली. ‘हातगाडी दोन दिवसांत हटव, नाही तर घरात घुसून मारू’. मात्र, कुलदीपने हातगाडी बंद न करता काम सुरू ठेवले. त्याचा राग धरून काही संशयितांनी एकत्र येत त्याच्या घरीच घुसून त्याच्यावर हल्ला केला. याप्रकरणी कुलदीपने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अद्याप अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पीडित कुलदीप याने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलीला वाचवायला ५ जणांनी नदीत उड्या मारल्या, पाचही जण बुडाले, मुलगी वाचली

देऊळ बंद 2 ने रितेश देशमुखच्या सिनेमाला टाकलं मागं, 10 व्या दिवशी कोट्यवधीची कमाई, मध्यरात्रीचे शो सुद्धा हाऊसफुल्ल

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Latest Marathi News Live Update : प्रमुख मंदिरांच्या अधिकारांमध्ये मोठा बदल; धर्मदाय आयुक्तालयाकडे संपूर्ण सूत्रे

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरात २१ दिवसांत ८६० गावठी दारू अड्ड्यांवर कारवाई; पांगरमलसारख्या दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती कायम

SCROLL FOR NEXT