मुंबई

गटारातील पाण्यावर पिकतोय भाजीपाला

CD

गटारातील पाण्यावर पिकतोय भाजीपाला
कळव्यातील प्रकार; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
किरण घरत ः सकाळ वृत्तसेवा
कळवा, ता. १० : कळवा पूर्वेतील मफतलाल कंपनीच्या मोकळ्या जागेवर व कळवा कारशेडमागील रेल्वेच्या जागेत गटाराच्या दूषित पाण्यावर मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकविला जात आहे. हा पिकविलेला भाजीपाला धुण्यासाठीही गटाराच्या पाण्याचा उपयोग केला जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. हा भाजीपाला कळवा, ठाणे व मुंबईतील भाजीविक्रेत्यांकडे पाठविला जात आहे, त्यामुळे अशा दूषित पाण्यात पिकविलेल्या भाजीपाल्यामुळे ठाणे, मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कळवा पूर्वेला कामगार आणि कंपनीच्या वादात मफतलाल ही कंपनी बंद पडली आहे. त्यामुळे कंपनीची शकडो एकर जमीन सध्या मोकळी असून ती न्यायालयाच्या ताब्यात आहे. त्यावर काही भूमाफियांनी अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली आहे. तसेच कळवा येथे रेल्वेच्या कारशेडला लागून मोकळ्या जागेत शेती तयार करून भाजीपाला तयार केला आहे. या परिसरातून वाहणाऱ्या गटाराच्या दूषित पाण्यावर ही शेती केली जात आहे. हा भाजीपाला परप्रांतीय शेतकरी पिकवित आहेत.

कळवा पूर्व आतकोनेश्वर, आनंदनगर, भास्करनगर परिसरातून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या झोपडपट्टीतील सांडपाणी, घाण, कचरा, प्लॅस्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणात वाहत येतात. तसेच छोटी गटारेही मोठ्या प्रमाणात या नाल्यात सोडण्यात आली आहेत. या गटारात कचरा कुजतो, त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटते. याच गटाराचे पाणी अडवून पाण्यावर शेतात वाफे तयार करून चवळी, पालक, मुळा, मेथी, माठ, राई, दुधी या भाज्यांची लागवड केली जात आहे. तसेच हा भाजीपाला कारशेडच्या भिंतीला लागून असलेल्या गटारात धुतला जातो, असा येथून शेकडो क्विंटल भाजीपाला कळवा, ठाणे व दादरमधील बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला जातो.

नाशिक, पुणे येथून येणाऱ्या भाजीपाल्यांपेक्षा कळव्यातून येणारा भाजीपाला स्वस्त आहे. अनेकजण स्वस्त दरात मिळतात म्हणून खरेदी करतात; परंतु या भाज्या स्वस्त मिळत असल्या तरी त्या शिजवल्यावर बेचव लागतात. त्याला विशिष्ट प्रकारची दुर्गंधी येते. हा भाजीपाला पिकविण्यासाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तसेच गटारातून येणाऱ्या अनेक दूषित पदार्थांमुळे या भाज्यांच्या माध्यमातून अनेक विषारी घटक शरीरात जात असल्याने अंगाला खाज सुटणे, पुरळ येणे, पोटातील अल्सर, मुतखडा तसेच कॅन्सरचे आजार होण्याची भीती आहे; मात्र भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यावर ठाणे महापालिका आरोग्य विभाग कोणतीच कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात कळवा प्रभाग समिती घनकचरा व आरोग्य विभागाच्या उपमुख्य स्वच्छता अधिकारी मयूरी अंबाजी यांच्याशी संपर्क साधला; मात्र त्या आजारी असल्याने त्यांचा फोन बंद असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

गटाराच्या पाण्यात धुतलेला हा भाजीपाला आरोग्यासाठी धोकदायक आहे. यामुळे अनेक आजार होऊ शकतात, अशाप्रकारे शेती करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी.
- भरत तारमाळे, दक्ष नागरिक, कळवा

कळवा स्थानक परिसरात घेतलेला भाजीपाला बेचव असून या भाज्यांना विशिष्ट प्रकारचा वास येतो, त्यामुळे अशा विक्रेत्यांवर कारवाई व्हायला हवी.
- सीमा जाधव, गृहिणी, कळवा

दूषित पाण्यातील भाज्यांमुळे त्वचेचे व इतर घातक आजार जडतात, त्यामुळे गृहिणींनी भाज्या खात्री करूनच खरेदी कराव्यात.
- डॉ. महेश हरड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताची ३७ जहाजं होर्मुझमध्ये अडकून, देशात कच्च्या तेलाचा साठ किती? खतांचे काय? पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितली आकडेवारी

Pune Land Action: शर्तभंग झालेल्या ३० भूखंडांवर सरकारची मोठी कारवाई; पुणे-पिंपरीत कोट्यवधींच्या जमिनी ताब्यात, २०० कोटींची मालमत्ता जप्त

Latest Marathi News Live Update : दिल्लीत 'क्वाड'च्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक

देऊळ बंद २ ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, 5 दिवसात कमावले तब्बल 'इतके कोटी'

Chhatrapati Sambhajinagar: पैठणचे गोदापात्र पडले कोरडेठाक; घाण, कचरा सडून परिसरात दुर्गंधी; धार्मिक विधींना मोठा फटका

SCROLL FOR NEXT