मुंबई

लाडक्या बहिणींचे बजेट कोलमडले

CD

जव्हार, ता. १० (बातमीदार) : तालुक्यात रोजगार आणि शिक्षणाची मोठी वानवा आहे. विशेष बाब म्हणून येथील महागाई दर दहा ते पंधरा वर्षे कमी केल्यास या भागाच्या विकासाला चालना मिळू शकते. मात्र, सरकार आणि प्रशासनाच्या नकारात्मक मानसिकतेमुळे या भागातील समस्या दिवसागणिक वाढत आहे. हे भयान वास्तव असताना सरकारने पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेल दरात वाढ करत सिलिंडरही महाग केले आहे. त्यामुळे आदिवासी आणि ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींचे वाढत्या दरवाढीने बजेट कोलमडले आहे.
घरगुती वापरायच्या सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे स्वयंपाक महागला आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. यात अधिक भर म्हणजे १ एप्रिलपासून विजेचे दर प्रति युनिट ६० पैशांनी वाढवत असल्याचेही परिपत्रक महावितरणने काढले आहे. याची झळही वीज ग्राहकांना सोसावी लागणार आहे. या दोन निर्णयांमुळे नवीन आर्थिक वर्षात सामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे.

गॅससाठी मोजा ९०० रुपये
जव्हार शहरात गॅस सिलिंडर सुमारे ८५० रुपयांना उपलब्ध होत होते. सरकारने त्यात ५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे सिलिंडरसाठी ग्राहकांना आता ९०० रुपये मोजावे लागणार आहेत. उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत कुटुंबांना ५०० रुपयांत गॅस सिलिंडर मिळत होता. आता त्यासाठी ५५० रुपये मोजावे लागणार आहेत. उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी गरीब आहेत. काहींना चुलीवर स्वयंपाक करावा लागणार आहे.

तेल दरवाढीमुळे महागाई
तेल दरवाढीमुळे महागाई वाढली आहे. वाहतूक, ऊर्जा आणि अनेक उत्पादनांच्या निर्मितीत याचा परिणाम होतो, ज्यामुळे सर्वसामान्य वस्तू आणि सेवांचे दर वाढतात. आता प्रत्येक कुटुंबाकडे गॅस सिलिंडर आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील काही कुटुंबे चुलीवर स्वयंपाक करतात. मात्र, शहरी भागातील नागरिकांना गॅसवर स्वयंपाक केल्याशिवाय पर्याय राहत नाही.

निवडणुकीपूर्वी राज्यकर्त्यांनी लाडक्या बहिणी आणि येथील आदिवासींना आश्वासनांचे गाजर दाखवले. ते आश्वासन पाळत नसून सामान्य नागरिकांवर आर्थिक भार लादला आहे. गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यास त्याचा परिणाम घरगुती बजेटवर होतो. गॅसच्या किमती वाढवू नये, अशी अपेक्षा आहे.
- उमेश रसाळ, सामाजिक कार्यकर्ते

शहरासह आता ग्रामीण भागातही गॅस सिलिंडरशिवाय पर्याय नाही. सिलिंडरचे दर वाढवून सरकारने सामान्य ग्राहकांवर अन्याय केला आहे. हे दर कमी करून दिलासा देणे गरजेचे आहे. सध्या प्रत्येक वस्तूंचे दर वाढले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी जगायचे कसे, असा प्रश्न आहे.
- प्राजक्ता शिंगडा, सरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विद्यार्थीनीनं रिचेकिंगला पाठवलं, उत्तरपत्रिका हातात येताच बसला धक्का; पहिलं पानं सोडून बाकीचं लिहिलं कुणी? CBSEचा सावळा गोंधळ

कोकण रेल्वेच्या शिल्पकाराला मानाचा मुजरा! सावंतवाडी स्टेशन ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ होणार; सरकारचा मोठा निर्णय

Yavatmal Diesel Supply : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ट्रॅक्टरच्या टाकीसह 40 लिटरच्या कॅनमध्ये मिळणार डिझेल; जिल्हाधिकाऱ्यांचे पेट्रोल पंपांना थेट आदेश

Latest Marathi News Live Update : सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना 140 हुन अधिक तरुणींना गंडवणाऱ्या भामट्याला अटक

‘चक दे इंडिया’ फेम रमाकांत दायमा यांचं निधन, आठवणीत कलाकार भावूक, चाहत्यांना धक्का

SCROLL FOR NEXT