डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
उल्हासनगर, ता. १० (बातमीदार) ः आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या सुभाष टेकडी येथील चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. बौद्ध समाजाचे धर्मगुरू भन्ते आनंद महाथेरो यांच्या हस्ते आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे आज अनावरण करण्यात आले.
या वेळी सुभाष टेकडीचा चौक रोषणाईने उजळून निघाला होता. सुभाष टेकडी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपूर्णाकृती पुतळा होता. त्याजागी पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याकडे केली होती. शिवसेनेचे उपशहरप्रमुख संदीप डोंगरे यांनीही किणीकरांचे याकडे लक्ष वेधले होते. किणीकरांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे साकडे घातल्यावर एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. दरम्यान, या वेळी शिवसेनेचे मुख्य पदाधिकारी, आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय पदाधिकारी, पुतळा स्मारक समितीचे आजी-माजी पदाधिकारी, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.