मुंबई

नवी मुंबईच्या विमानतळ धावपट्टीवर लँबोर्गिनीचा थरार

CD

नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर ‘लॅम्बोर्गिनी’चा थरार!
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० : नवी मुंबई येथे सिडकोच्या भागीदारीतून उभारण्यात येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (एनएमआयए) धावपट्टीवर काही दिवसांपूर्वी ‘लॅम्बोर्गिनी’ या स्पोर्ट कारचा थरार पाहायला मिळाला. स्पोर्ट्‌स कारसंबंधी माहिती प्रकाशित करणाऱ्या एका मासिकासाठी ही कार धावल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य आणि केंद्र सरकारची परवानगी नसताना केवळ ‘एनएमआयए’ या कंपनीच्या परवानगीच्या आधारे ही कार धावल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सकाळ’ला दिली.

मुंबई विमानतळावर येत असलेला ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई येथे सिडको आणि अदाणी यांच्या भागीदारीतून जगातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ उभारले जात आहे. या विमानतळात अत्याधुनिक सोयी-सुविधा पुरविल्या जाणार आहेत. हे विमानतळ जूनमध्ये सुरू करण्यात येणार असल्याचे अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी नुकते जाहीर केले होते. त्यानुसार या विमानतळावर धावपट्टी तयार असून, आतापर्यंत हवाई दलाच्या विमानांनी उड्डाण करून परीक्षण केले आहे. रडारदेखील बसवण्यात आले असून, केंद्रीय सुरक्षा संस्था या विमानतळाच्या सुरक्षेबाबत काळजी घेत आहेत. एवढी सुरक्षा बाळगली जात असताना या धावपट्टीवर ‘लॅम्बोर्गिनी’ ही स्पोर्ट कार धावली. याबाबत कारचालकाने आम्हाला एक्सक्लुझिव्‍ह परवानगी मिळाली आहे, असे व्हायरल व्हिडिओत म्हटले आहे. दरम्यान, कार चालवण्यासाठी दिलेल्या परवानगीचा वाणिज्यिक फायदा कंपनीला झाला नसल्याचे ‘एनएमआयए’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सकाळ’ला सांगितले. या व्‍हिडिओनंतर मासिकाला विमानतळाची धावपट्टी खासगी वापराची परवानगी द्यायचा अधिकार ‘एनएमआयए’ला आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मान्सूनपूर्व पावसानं रत्नागिरी, सिंधूदुर्गला झोडपलं; येत्या ३ दिवसात वादळी वाऱ्यासह हजेरी लावणार, हवामान विभागाचा इशारा

Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांकडे असतो ज्ञानाचा खजिना; पण दुसऱ्यांना देतात चुकीची माहिती, यांच्यापासून रहा सावध

Kolhapur Gokul Dudh Sangh Election 2026 : आदेश आला रे..! कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू; ठराव दाखल तारीख जाहीर

नितीन देसाई नैराश्यात होते हे माहीत असूनही इंडस्ट्रीने त्यांना मदत का केली नाही? संजय जाधव यांनी सांगितलं कारण

Ganga Dussehra: भागीरथ प्रयत्नांची ती अमर गाथा! गंगा दशहऱ्याला काशीत भाविकांचा महापूर; जाणून घ्या आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT