शेतकरी ओळख क्रमांकासाठी १५ एप्रिलची मुदत
कृषी योजनांसाठी अनिवार्य; शेतकऱ्यांची तारांबळ
वाणगाव, ता. १३ (बातमीदार) : कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभांसाठी १५ एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबतचा आदेश प्रसिद्ध केला आहे; मात्र केवळ दोनच दिवस शिल्लक असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडणार आहे.
राज्यातील कृषी क्षेत्रातील डिजिटल सेवांचा वापर करून सरकारच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने राज्यात ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या व त्यांच्या शेतांच्या आधार संलग्न माहिती संच, शेतकऱ्यांच्या शेतावरील पिकांची माहिती संच व शेतांचे भू संदर्भिकृत यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी आता १५ एप्रिलपासून फार्मर आयडी बंधनकारक केला आहे. त्याबाबतचा निर्णय शुक्रवारी (ता. ११) राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून जारी करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी १५ एप्रिलपर्यंत फार्मर आयडी तयार करून घ्यावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने देण्यासाठी, शेतकऱ्यांची ओळख पटविण्यासाठी, पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे या उद्दिष्टाने ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य केला आहे.
कृषी विभागाच्या पीएम किसान, पीक विमा, महाडीबीटी पोर्टलवरील योजना, नैसर्गिक आपत्तीत अनुदान व इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक प्रकल्पांतर्गत शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) अनिवार्य/ बंधनकारक केला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिनांक १५ एप्रिलपर्यंत जवळच्या सी.एस.सी. केंद्रावर जाऊन आपला शेतकरी ओळख क्रमांक लवकरात लवकर तयार करून घ्यावा.
- नीलेश भागेश्वर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पालघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.