मुंबई

आरोपी विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या

CD

सुधारित बातमी

आरोपी विशाल गवळीची
तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील लैंगिक अत्याचार व हत्या प्रकरण

नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : चार महिन्यांपूर्वी कल्याण पूर्वेत राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील आरोपी विशाल गवळी याने तळोजा कारागृहातील शौचालयात टॉवेलने गळफास घेऊन रविवारी (ता. १३) पहाटे आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, विशालचे कुटुंबीय आणि वकिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करून चौकशीची मागणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केली आहे.

आरोपी विशाल गवळी याने डिसेंबरमध्ये कल्याण पूर्वेतील १३ वर्षांच्या मुलीला घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर विशालने या मुलीची घरात हत्या करून पत्नी साक्षी गवळी हिच्या मदतीने तिचा मृतदेह कल्याण-भिवंडी मार्गावर बापगाव हद्दीत फेकून दिला होता. त्यानंतर विशालने बुलढाणा जिह्यातील पत्नीच्या गावी शेगाव येथे पलायन केले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने शेगाव येथून त्याला अटक केली होती. तीन महिने तपास करून आरोपी गवळी याने गुह्यात वापरलेले हत्यार, गांधारे नदीत फेकून दिलेली पिशवी आणि इतर वस्तू हस्तगत केल्या होत्या. त्याला तळोजा कारागृहातील सर्कल क्रमांक १ मधील बरॅक नंबर ११ येथे न्यायालयीन कोठडीत ठेवले होते. त्याने रविवारी पहाटे ४.३० च्या सुमारास येथील स्वच्छतागृहात टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. इतर कैदी शौचालयात गेले असता हा प्रकार उघडकीस आला.
कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्यानंतर आवश्यक कार्यवाही करून याबाबत त्याच्या नातेवाइकांना माहिती देण्यात आली आहे. पंचनामा करून त्याचा मृतदेह मुंबईतील जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी दिली.
----------------------
विशाल गवळी याला आत्महत्या करायची असती, तर त्याने यापूर्वीच आत्महत्या केली असती. टॉवेलने गळफास बसू शकत नाही. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या आहे. कारागृह प्रशासन किंवा पोलिस यापैकी कोणीही गवळी याला मारले आहे किंवा त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून सखोल तपास होणे आवश्यक आहे. सीसीटीव्हीची तपासणी करणे गरजेचे आहे.
- ॲड. संजय धनके, विशालचे वकील
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT