वासिंद, ता. १५ (बातमीदार): मेंदूत रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या वासिंदमधील प्रवीण चन्ने यांचे अवयवदान करण्यात आले आहे. या निर्णयातून चन्ने परिवाराने ग्रामीण भागातील जुनाट रूढी-परंपरांना बगल दिली असून, अनेकांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
कित्येक वर्षांपासून वासिंदमध्ये राहणाऱ्या ४४ वर्षीय प्रवीण रिलायन्स जिओमध्ये नोकरी करत होता. अचानक रक्तदाब वाढल्याने त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले, परंतु मेंदूत रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दलित पॅन्थर चळवळीत योगदान असलेल्या चन्ने कुटुंबाने अशा कठीण प्रसंगातही सामाजिक भान जपले. प्रवीणचे वडील अशोक चन्ने यांनी काळजावर दगड ठेवत मुलाच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी अवयवदानाचा निर्णय घेतला. एम्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी यासाठीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल, डी. वाय. पाटील, पुणे, ननावटी हॉस्पिटल, फोर्टिज हॉस्पिटल, मुलुंड येथील गरजू रुग्णांसाठी प्रवीणचे अवयव देण्यात आले. चन्ने परिवाराने स्वतःवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना कित्येक कुटुंबाला आनंद देताना समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.
---------------------------------------------
ग्रामीण भागात गैरसमज, अज्ञान
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अवयवदानाच्या विषयी विविध गैरसमज, अज्ञान आहे. या रूढी-परंपरांच्या प्रभावामुळे अवयदानाविषयी विविध तर्कवितर्क काढत विरोध केला जातो, पण ‘नाशवंत देह जाणार सकळ, मात्र आत्मा अमर आहे’, असे संत वचन असले तरी विज्ञानाच्या जोरावर शरीरदेखील अमर राहू शकते. मुलाच्या अवयवदानातून चन्ने परिवाराने हाच आदर्श तालुक्यातील प्रत्येकापुढे ठेवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.