मुरबाड, ता. १५ (बातमीदार)ः मुरबाड शहर परिसरात चाळवजा बांधकामे करण्यात आलेली आहेत. ही बांधकामे नगर पंचायतीच्या परवानगीशिवाय झाली असल्याने अशा बांधकामांवर कारवाईची मागणी होत आहे. याच मुद्द्यावरून बुधवारी होणारी नगर पंचायतीची सर्वसाधारण सभा गाजण्याची शक्यता आहे.
मुरबाड शहराच्या मुख्य रस्त्यावर शासकीय व निमशासकीय जागेवर मोठ्या प्रमाणात पक्की बांधकामे असलेल्या बेकायदा व्यापारी टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत. गेल्या सात वर्षांपासून या बांधकामांवर कारवाई झालेली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या टपऱ्यांमधील पहिला गाळा नगराध्यक्ष संतोष चौधरी यांच्या नावाने मुरबाड नगर पंचायतीकडे नोंद आहे. याप्रकरणी नगर पंचायतीने २६ डिसेंबर २०१७ रोजी नोटीस पाठवून बेकायदा बांधकाम काढून टाकावे, अशी सूचना दिली होती, असे शिंदे गटाचे मुरबाड तालुकाप्रमुख संतोष जाधव यांचे म्हणणे आहे, मात्र हे बांधकाम तोडण्यात आलेले नसल्याने नगराध्यक्षांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे. याबाबत नगराध्यक्ष संतोष चौधरी यांनी मुरबाड शहरात असे कोणतेही बांधकाम नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.