मुंबई

उदय उतेकर यांना शिवछत्रपती पुरस्कार

CD

उदय उतेकर यांना शिवछत्रपती पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : टेकडी बंगला परिसरातील रहिवासी व रेल्वे कर्मचारी उदय उमेश उतेकर यांना वॉटरपोलोमधून राज्य सरकारचा क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र व रेल्वेच्या संघातून खेळताना उदय उतेकर यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांवरही आपला स्वतंत्र ठसा उमटविला. भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी उतेकर यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील उज्ज्वल कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. गेल्या १० वर्षांपासून उदय उतेकर यांनी अतुलनीय कामगिरी बजावत आहेत. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना वॉटरपोलोमधील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला. वयाच्या चौथ्या वर्षी ते पोहण्यास शिकले. त्यानंतर त्यांनी १५व्या वर्षांपासून वॉटरपोलो खेळण्यास सुरुवात केली. त्यांची १८व्या वर्षी मध्य रेल्वे संघात निवड झाली. उदय उतेकर यांनी महाराष्ट्र व रेल्वेचे विविध स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले. २०१५ पासून झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली आहे. तर सिंगापूर व थायलंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET पेपरफुटी प्रकरणी पहिली कारवाई, भिवंडीतून तीन आरोपींना अटक; पेपर लीक करणारे हात नेमके कुणाचे?

Mumbai News: ऑफर पडली महागात! ग्राहकांच्या गर्दीने शोरूमला सेल रद्द करण्याची वेळ; इन्फिनिटी मॉलमध्ये गोंधळ

TET चा पेपर नेमका कसा फुटला? भिवंडीत काय घडलं? परीक्षा अचानक रद्द; राज्य परीक्षा परिषदेचं पत्र आलं समोर

Latest Marathi News Live Update : ऑपरेशन टायगरच्या यशानंतर श्रीकांत शिंदे शनी चरणी होणार नतमस्तक...

Lorcan Tucker: भारताविरुद्ध आता मालिकाच जिंकलो, तर...' आयर्लंडचा कर्णधार ऐतिहासिक विजयानंतर नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT