नालासोपाऱ्यात आढळला सात वर्षांच्या मुलीचा मृतदेह
नालासोपारा, ता. १८ (बातमीदार) : संतोषभूवन परिसरात एका सात वर्षांच्या चिमुरडीचा संशयास्पद मृतदेह गुरुवारी (ता. १७) आढळून आला. या मृतदेहाच्या गळ्यावर व्रण आढळून आल्याने तिची हत्या, आत्महत्या की अकस्मात मृत्यू याबाबत संशय वाढला आहे. याबाबत पेल्हार पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अंजली मिथुन शर्मा (वय ७) असे मृत मुलीचे नाव असून, ती संतोषभूवन परिसरातील काशी विश्वनाथ मंदिराच्या पाठीमागे गल्ली नंबर ३, पांडुरंग चाळ, रूम नंबर एक येथे राहात होती. या मुलीचे आई-वडील हे कामावर गेले होते, तर तिचा १२ वर्षांचा भाऊही घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. ही चिमुरडी घरात जखमी अवस्थेत शेजाऱ्यांना गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आढळून आली. त्यांनी तिला तत्काळ वसई-विरार महापालिकेच्या तुळिंज येथील रुग्णालयात दाखल केले व तिच्या आई-वडिलांना याची माहिती दिली. यामध्ये डॉक्टरांनी अंजली हिला मृत घोषित केले, मात्र या चिमुरडीच्या गळ्यावर व्रण असल्याने याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे, मात्र शवविच्छेदन अहवालानंतर या चिमुरडीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.